आम्ही आणि आमचे बाप
आम्ही आणि आमचे बाप हे नाटक पु.ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे यांच्या निवडक कलाकृतींवर आधारलेले आहे. या नाटकाची निर्मिती मयुर रानडे, दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांनी केली. नाटकाच्या पहिल्या प्रयोगात आनंद इंगळे, अजित परब, अतुल परचुरे आणि पुष्कर श्रोत्री यांनी भूमिका केल्या होत्या. नाटकाचे संकलन आणि दिग्दर्शन आनंद इंगळे यांचे होते.
१५ जुलै २०१७ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.