आनापान सती
आनापान सती
आनापान सती श्वास घेताना आणि श्वास सोडताना ध्यान करणे, हा बुद्धांनी महा-सतिपठ्ठण सुत्तमध्ये स्पष्ट केलेला ध्यान करण्याचा पहिला विषय आहे. हा मार्ग जो भगवान बुद्धांनी मानव जातीच्या कल्याणासाठी शोधला ज्याचे अनुकरण करत अनेक जीव ह्या संसार चक्रातून बाहेर पडले. या मार्गाचे पालन अनेक राष्ट्र पूर्ण श्रद्धेने व गांभीर्याने पालन करतात
आनापान सती सर्वात सोपी ध्यान पद्धत आहे जी कधीही कुठेही केली जाऊ शकते. बुद्ध धम्मात आनापान सतीस अनन्य साधारण महत्त्व आहे आपण भगवान बुद्धाच्या आज जे काही शिल्प पाहतो त्यामध्ये भगवान बुद्ध आनापान सती करताना दिसतात. ज्या प्रमाणे आज जगात शरीर बळकट ठेवण्याकरिता व्यायाम करावयास सांगितले जाते, त्याप्रमाणे मनास बळकट करण्यासाठी भगवान बुद्धांनी आनापान सती साधना करण्यास सांगितली आहे.
१. आनापान सती उगम २. आनापान सती अभ्यास ३. आनापान सती सूत |