आनंदीबाई किर्लोस्कर
आनंदीबाई शंकरराव किर्लोस्कर (१९०५:टिलाटी, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र १७ सप्टेंबर, १९४२: किर्लोस्करवाडी, महाराष्ट्र) या मराठी लेखिका होत्या. या मराठी उद्योजक शं.वा. किर्लोस्कर यांच्या पत्नी तसेच स्त्री मासिकाच्या संपादिका, शांताबाई किर्लोस्कर यांच्या आई होत. आनंदीबाईंनी कथा आणि नाटके लिहिली. त्यानी स्त्री मासिकाचे संपादन केले. त्यांनी अध्यापनशास्त्राचे शिक्षण घेतले होते व त्या किर्लोस्करवाडीतील प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या.
नव्या वाटा या त्यांच्या पुरुषपात्रविरहित नाटकात आनंदीबाईंनी परित्यक्ता, प्रौढ कुमारिका यांच्या जीवनविकासाठी नव्या वाटा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विवाहपद्धतीतील दोष नाहीसे करून, स्त्रीजीवन सुखकारक करण्यासाठी नव्या वाटा चोखाळण्याचा मार्ग त्यांनी आपल्या नव्या वाटा या नाटकातून सुचवल्या आहेत. कथासंग्रह आणि नाटकाव्यतिरिक्त आनंदीबाईंनी काही श्रुतिकाही लिहिल्या आहेत.
लेखन
श्रुतिका
- कथासंग्रह:
१. अंतरंग (इ.स.१९४६)
२. ज्योती (इ.स.१९४४)
३. प्रतिबिंब (इ.स.१९४१)
नाटक
ा १. नव्या वाटा (इ.स.१९४१).