आनंदराव देशपांडे
ॲडव्होकेट आनंदराव देशपांडे हे महाराष्ट्रातले अभिनेते व मराठी लेखक आहेत. ते बी.काॅम., एम.ए.(इतिहास), एल्एल.बी. आहेत, व वकिली करतात.
अभिनय
- शिवछत्रपति प्रतिष्ठानने निर्मिलेल्या बाबासाहेब पुरंदरे दिग्दर्शित जाणता राजा या महानाट्यात आनंदराव देशपांडे यांचा १९८८पासून सहभाग आहे. त्या नाटकाच्या २७५हून अधिक प्रयोगांत आनंदरावांनी मध्यमवयीन शिवाजीची, आणि सूत्रधार शाहीराची भूमिका केली आहे. या प्रयोगाच्या निमित्ताने आनंदरावांनी १९९७ साली अमेरिकेचा व २०१५ साली इंग्लंडचा दौरा केला आहे.
- विनय धुमाळे निर्मित व दिग्दर्शित 'लोकमान्य' या लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित दूरचित्रवाणीवरील हिंदी मालिकेत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची भूमिका आनंदरावांनी केली होती.
- मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ' रमा माधव ' व दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फर्जंद' व 'फत्तेशिकस्त' या ऐतिहासिक चित्रपटांतून आनंदरावांनी कामे केली आहेत.
सल्लागार आणि मार्गदर्शक
- शिवछत्रपति प्रतिष्ठानच्या वतीने पुण्याजवळच्या आंबेगाव येथे साकारल्या जाणाऱ्या शिवसृष्टीच्या भव्य प्रकल्पाचे आनंदराव देशपांडे हे सल्लागार आहेत.
- 'फर्जंद' व 'फत्तेशिकस्त' या ऐतिहासिक चित्रपटांतून आनंदरावांनी कामे केली आहेत.
- ते १९९०पासून ३ राष्ट्रीयकृत बँका, ७ सहकारी बँका, ३ खाजगी वित्तीय संस्था व इंडियन ऑईल काॅर्पोरेशन या राष्ट्रीय संस्थेचे कायदेशीर सल्लागार आहेत.
लेखन
- आनंदराव देशपांडे यांनी गो.नी. दांडेकरांच्या 'पुनर्भेट - गोनीदांच्या साहित्यकृतीची 'हे पुस्तक लिहिले आहे.
- त्यांचे दुर्गभ्रमंतीतील अनुभवांवर आधारित 'कातळमनीचा ठाव' हे ललित लेखांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.
सन्मान
- आनंदराव देशपांडे हे गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या दुर्ग साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
- महाराष्ट्र राज्य नाट्य परीक्षण मंडळाचे सदस्यत्व.