Jump to content

आनंद यादव

आनंद यादव
जन्म नाव आनंद रतन यादव
जन्म ३० नोव्हेंबर १९३५
कागल ,कोल्हापूर, महाराष्ट्र
मृत्यू २७ नोव्हेंबर २०१६
पुणे
कार्यक्षेत्र साहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती झोंबी

आनंद यादव (जन्म : कागल, ३० नोव्हेंबर १९३५; - पुणे, २७ नोव्हेंबर २०१६) हे मराठी लेखक होते. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.

जीवन

आनंद यादव यांनी कोल्हापूरपुणे येथून आपले शिक्षण पूर्ण केले‌. आकाशवाणीवर त्यांनी काही काळ नोकरी केली. पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. लेखनातूनही निवृत्ती घेण्याचा इरादा त्यांनी २९ एप्रिल २०१३ रोजी बोलून दाखविला होता.

यादव हे मराठीतील महत्त्वाचे ग्रामीण कांदबरीकार होते.

आनंद यादवांच्या कन्या डाॅ. कीर्ती मुळीक ह्याही लेखिका आहेत.

पुरस्कार

त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी इ.स. १९९०मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

संतसूर्य तुकाराम

आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या संतसूर्य तुकाराम या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोळ करून त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतरदेखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली.

वारकऱ्यांनी आनंद यादव यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली. आनंद यादव, पुस्तकाचे प्रकाशक व मुद्रक यांची पोलिसांनी जामिनावर सुटका केली. यादव मृत्यूपर्यंत जामिनावर होते.

प्रकाशित साहित्य

आनंद यादव यांनी सुमारे ४०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे प्रकाशित झालेले काही साहित्य पुढीलप्रमाणे-

काव्यसंग्रह

  • मळ्याची माती १९७८
  • मायलेकरं (दी‍र्घकविता) १९८१
  • हिरवे जग १९६०

कथासंग्रह

  • आदिताल १९८०
  • उखडलेली झाडे १९८६
  • खळाळ १९६७
  • झाडवाटा
  • घरजावई (विनोदी)१९७४
  • डवरणी) १९८२
  • भूमिकन्या (कथासंग्रह)
  • माळावरची मैना १९७६
  • शॆवटची लढाई (विनोदी कथासंग्रह)

व्यक्तिचित्रे

  • मातीखालची माती (१९६५)

ललित, वैचारिक लेख संग्रह/समीक्षा ग्रंथ

  • आत्मचरित्र मीमांसा
  • १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह
  • ग्रामसंस्कृती
  • ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव
  • ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या
  • पाणभवरे (१९८२)
  • मराठी लघुनिबंधाचा इतिहास
  • मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती
  • साहित्याची निर्मिति प्रक्रिया
  • साहित्यिक जडण - घडण
  • साहित्यिकाचा गाव
  • स्पर्शकमळे (१९७८)

कादंबऱ्या

  • एकलकोंडा १९८०
  • कलेचे कातडे
  • गोतावळा १९७१
  • नटरंग (पुस्तक) १९८०. या कादंबरीवर त्याच नावाचा मराठी चित्रपट निघाला.
  • माऊली १९८५
  • संतसूर्य तुकाराम

आत्मचरित्रात्मक

बालसाहित्य

  • उगवती मने
  • सैनिकहो तुमच्यासाठी