आदिनाथ कोठारे
आदिनाथ कोठारे | |
---|---|
जन्म | आदिनाथ महेश कोठारे १३ मे, १९८४ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट) |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी |
वडील | महेश कोठारे |
पत्नी | ऊर्मिला कानिटकर (ल. २०१३) |
adinathkothare |
आदिनाथ कोठारे हे मराठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. हे महेश कोठारे यांचे पुत्र आहेत. यांनी माझा छकुला चित्रपटात पहिल्यांदा बालकलाकाराची भूमिका केली. कोठारे यांनी एम.बी.ए.चे शिक्षण घेतले आङे. हे रंगमंचावरही भूमिका करतात..
व्यक्तिगत जीवन
यांचे लग्न ऊर्मिला कानिटकर या मराठी अभिनेत्री-नर्तकींशी झालेले आहे. कोठारे शुभमंगल सावधान या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक असताना कानिटकर त्यात अभिनय करीत होत्या. सिटी ऑफ ड्रीम्सच्या दुसऱ्या सीझनमधे त्यांनी महेश आरवले नावाच्या सळसळत्या रक्ताच्या तरुण तडफदार नेत्याची भूमिका साकारली आहे.
चित्रपट
- अनवट
- झपाटलेला २
- माझा छकुला
- दुभंग
- माझा छकुला
- वेड लावी जिवा
- शुभमंगल सावधान
- स्टॅंडबाय
- हॅलो नंदन