आत्माराम रावजी देशपांडे
आत्माराम रावजी देशपांडे | |
---|---|
जन्म नाव | आत्माराम रावजी देशपांडे |
टोपणनाव | अनिल |
जन्म | ११ सप्टेंबर १९०१ मूर्तिजापूर, (महाराष्ट्र) |
मृत्यू | ८ मे, १९८२ (वय ८०) नागपूर, (महाराष्ट्र-भारत) |
कार्यक्षेत्र | काव्य, साहित्य, समाजशिक्षण |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता |
विषय | मराठी |
वडील | रावजी रामचंद्र देशपांडे |
आई | यमुनाबाई रावजी देशपांडे |
पत्नी | |
अपत्ये | किशोर, शिरीष, उल्हास, अभय |
पुरस्कार | साहित्य अकादमी पुरस्कार |
आत्माराम रावजी देशपांडे (जन्म : मूर्तिजापूर, ११ सप्टेंबर १९०१; - ८ मे १९८२) हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी - १० चरणांची कविता - हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.
जीवन
मूर्तिजापूर या गावी शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते इ.स. १९१९ पुणे शहरास आले. फर्ग्युसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा अभ्यासक्रम करीत असतानाच त्यांचा कुसुम जयवंत ह्या तरुणीशी परिचय झाला, त्याचे पुढे प्रेमात रूपांतर होऊन, प्रेमाची ६ ऑक्टोबर १९२९ रोजी विवाहात परिणती झाली. .
पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कवी अनिलांनी कलकत्त्याला प्रयाण केले. तेथे त्यांना अवींद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसू ह्यांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी व नंतर सनद घेतल्यावर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. १९४८ साली मध्यप्रदेश सरकारतर्फे त्यांची सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यांनी १९५६ साली दिल्लीच्या राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्राच्या मुख्याधिकारीपदावर व पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाच्या सल्लागार ह्या पदांवर त्यांच्या नेमणुका झाल्या.
कवी अनिलांना इ.स. १९७९ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती.
कवी अनिलांचे ८ मे १९८२ रोजी नागपूर येथे निधन झाले.
कवि अनिलांच्या ध्वनिमुद्रित झालेल्या अजरामर कविता
- अजुनी रुसून आहे (गायक - कुमार गंधर्व)
- आज अचानक गाठ पडे (गायक - कुमार गंधर्व)
- कुणी जाल का सांगाल का (गायक - वसंतराव देशपांडे, राहुल देशपांडे; संगीतकार यशवंत देव)
- गगनी उगवला सायंतारा (गायक - गजानन वाटवे)
काव्यसंग्रह
- कवी अनिल यांची संपूर्ण कविता (संपादक : श्याम माधव धोंड). या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार मिळाला आहे.
- दशपदी १९७६
- निर्वासित चिनी मुलास (दीर्घकाव्य) १९४३ (या पुस्तकाचा कुसुमावती देशपांडे यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे)
- पेर्ते व्हा १९४७
- फुलवात १९३२
- भग्नमूर्ती (दीर्घकाव्य) १९३५
- सांगाती १९६१
कवी अनिल आणि त्यांच्या काव्यासंबंधीची पुस्तके
- कवी अनिल यांची संपूर्ण कविता (संपादक - श्याम माधव धोंड)
- कवी 'अनिलां'ची साहित्यदृष्टी (प्राचार्य पंडितराव पवार)
गौरव
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, मालवण, १९५८
बाह्य दुवे
- कवी अनिलांच्या कवितांचे इंग्रजीत रूपांतर (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)