Jump to content

आत्माराम भैरव जोशी

Atmaram Bhairav Joshi (sl); আত্মারাম ভৈরব যোশী (bn); Atmaram Bhairav Joshi (fr); Atmaram Bhairav Joshi (ast); Atmaram Bhairav Joshi (nl); Atmaram Bhairav Joshi (ca); आत्माराम भैरव जोशी (mr); Atmaram Bhairav Joshi (es); ଆତ୍ମାରାମ ଭୈରବ ଜୋଶୀ (or); Atmaram Bhairav Joshi (sq); Atmaram Bhairav Joshi (ga); Atmaram Bhairav Joshi (en); Atmaram Bhairav Joshi (tr) ବିଜ୍ଞାନ ଓ ଇଞ୍ଜିନିୟରିଙ୍ଗରେ ପଦ୍ମ ଶ୍ରୀ (or); agrónomu indiu (1916–2010) (ast)
आत्माराम भैरव जोशी 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९१६, नोव्हेंबर १७, इ.स. १९१६
भारत
मृत्यू तारीखजुलै ३, इ.स. २०१०
पुणे
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • agronomist
सदस्यता
  • Indian National Science Academy
  • Indian Academy of Sciences
पुरस्कार
  • Padma Shri in science & engineering
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

डॉ. आत्माराम भैरव जोशी (१७ नोव्हेंबर, १९१६ - ३ जुलै, २०१०) हे एक भारतीय कृषिशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म जबलपूर येथे झाला व शिक्षण रायपूर, नागपूर, दिल्ली व केंब्रिजमध्ये झाले. वनस्पतिपेशीविज्ञान (Plant Genetics, Cytogenetics, Plant Breeding) हे त्यांचे अभ्यासाचे खास विषय होते.

१९३७ पासून १९७७ पर्यंत भारतीय कृषी संशोधन परिषद (दिल्ली) या संस्थेत असलेले डॉ. जोशी १९६६ साली त्या संस्थेचे उपमहासंचालक झाले. त्याच काळादरम्यान, म्हणजे १९६५-६६ व १९७२-७७ या काळात ते इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संचालक होते. १९७७-८० या काळात ते राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते.

भारतात १९७० च्या दशकात झालेल्या हरितक्रांतीत डॉ. जोशी यांचा महत्त्वाचा वाटा होता. जागतिक अन्न संघटनेच्या विनंतीवरून इंडोनेशिया, पेरू, नेदरलँड्स, बांग्लादेश, टांझानिया इत्यादी देशांचे धान्योत्पादन वाढविण्यातही त्यांचे मोठे योगदान होते.

भारतभरात कोणती पिके घ्यायची, एखाद्या पिकाची कोणती जात कोठे घ्यायची हे ठरविणाऱ्या राष्ट्रीय समन्वयक समितीचे ते अध्यक्ष होते. पीक उत्पादन वाढावे, त्यांची किंमतही कमी राहावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पिकांना होणारी रोगराई कमी करण्यासाठी औषध फवारणी करण्याऐवजी त्यांनी पिकातच तशी प्रतिकारशक्ती निर्माण होईल, अशी योजना केली. त्यामुळे पिकावर पडणारी कीड २० ते ३० टक्क्यांवरून दोन ते तीन टक्क्यांवर आली. त्यांनी भारतभर शेतकऱ्यांमध्ये याचा प्रचार-प्रसार केला. हे पाहून इतर शास्त्रज्ञांनीही याबाबत संशोधन सुरू केले. डॉ. जोशींच्या सल्ल्यामुळे गहू, मका, वरी, तांदूळ, कापूस, एरंडी, शेंगा, सोयाबीन, ताग, डाळी, तीळ, जनावरांसाठी चारा इत्यादी पिकांच्या उत्पादकतेत वाढ झाली.

जगात पिकांच्या मूळ जातींपासून नवनवीन जाती निर्माण होत आहेत. नवीन जातीत काही दोष निर्माण झाले, तर पुन्हा मूळ जातीचे संशोधन करून त्यांच्यातून हे दोष काढून टाकणे गरजेचे असते. यासाठी पिकांची सगळी मूळ वाणे जतन केली पाहिजेत, हा डॉ. जोशींचा सल्ला जागतिक अन्न संघटेनेने मान्य केला व तशी यंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकली. हे काम डॉ. जोशींनी पूर्ण केले. जिनिव्हातील जागतिक अन्न संघटनेची सल्लागार समिती जिनिव्हातूनच शेतीसंदर्भात सल्ले देण्याचे काम करीत असे. पण शेतकऱ्याला त्याच्या शेतावर जाऊन सल्ला दिला पाहिजे, असे डॉ.जोशींनी त्यांना सुचविले.

डॉ. जोशी यांनी आपल्या नोकरीदरम्यान विविध कामानिमित्त १९ देशांना भेटी द्याव्या लागल्या होत्या. त्यांच्या नावावर सुमारे ३०० शोधनिबंध आहेत.

३ जुलै २०१० रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी डॉ.जोशी यांचे पुणे येथे निधन झाले.

पुरस्कार

  • डॉ. आ. भै जोशी यांना इ.स. १९७६मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • त्यांना बोरलॉग पुरस्कार (Dr. Norman E. Borlaug Award), परभणी कृषी विद्यापीठ आणि गोविंद वल्लभ पंत विश्वविद्यालय यांनी डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित केले गेले होते.
  • डॉ. आ.भै. जोशी यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने कृषिक्षेत्रात लक्षणीय काम कराणाऱ्या शास्त्रज्ञांकरिता डॉ.ए.बी. जोशी स्मृति पुरस्कार ठेवला आहे. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. भारत सरकारच्या कृषिखात्याचे माजी सचिव, इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च(दिल्ली) या संस्थेचे माजी महासंचालक आणि (२०१२ साली) हरियाणा शेतकरी आयोगाचे प्रमुख असलेले डॉ. आर.एस. परोदा यांना २० फेब्रुवारी २०१२ रोजी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते पहिला डॉ.ए.बी. जोशी स्मृति पुरस्कार देण्यात आला.