आजा नचले (चित्रपट)
आजा नचले | |
---|---|
दिग्दर्शन | अनिल मेहता |
निर्मिती | आदित्य चोप्रा |
कथा | आदित्य चोप्रा जयदीप साहनी |
प्रमुख कलाकार | माधुरी दीक्षित, अक्षय खन्ना, इरफान खान, कुणाल कपूर, कोंकोणा सेन शर्मा |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ३० नोव्हेंबर २००७ |
अवधी | १४६ |
आजा नचले (हिंदी: आजा नचले ; रोमन लिपी: Aaja Nachle ; अर्थ: या, नाचू या ;) हा इ.स. २००७ साली पडद्यावर झळकलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. आदित्य चोप्रा, जयदीप साहनी यांच्या कथेवर आधारलेल्या व अनिल मेहता याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाद्वारे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने सहा वर्षांच्या चित्रपट-कारकीर्दीतील विरामानंतर पुनरागमन केले. माधुरीबरोबर या चित्रपटात अक्षय खन्ना, इरफान खान, कुणाल कपूर, कोंकोणा सेन शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बाह्य दुवे
- आजा नचले चित्रपटाचे अधिकृत संकेतस्थळ इंग्लिश (मराठी मजकूर)
- आय.एम.डी.बी. संकेतस्थळावर आजा नचले चित्रपटाची माहिती (इंग्लिश मजकूर)