आजरा
आजरा (इंग्रजी: Ajara / Ajra) हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असलेले गाव आहे.
भूगोल
हे गाव हिरण्यकेशी नदीच्या काठावर आहे आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा) हे पर्यटनस्थळ येथून ३५ कि.मी. अंतरावर आहे, तर गोवा येथून ६० ते ७० कि.मी. अंतरावर आहे. याच्या पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हाची सीमा तर उत्तरेला भुदरगड, पूर्वेला गडहिंग्लज व दक्षिणेला चंदगड तालुका आहे
गावात रवळनाथाचे सुंदर मंदिर आहे येथून रामतीर्थ या ठिकाणी प्रभू रामचंद्र वनवासात असताना एक रात्र राहिले होते अशी स्थानिक रहिवाश्यांची समजूत आहे. हे ठिकाण हिरण्यकेशी नदीच्या तीरावर असून याठिकाणी पुरातन राम मंदिर आहे.
आजरा गावाची सध्याची लोकसंख्या १८०००हून अधिक आहे. आजरा येथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यापैकी अग्रेसर म्हणून रोझरी इंग्लिश हाय स्कूलचे नाव घेतले जाते.इथूनच जवळ गवसे जवळ प्रसिद्ध साखर कारखाना देखील आहे.महाराष्ट्र शासनद्वारा पुरस्कृत धरणाचे बांधकाम जवळच असलेल्या वेलवट्टी येथे हळोली परिसरात होत आहे. येथील आजरा घणसाळ तांदुळ प्रसिद्ध आहे. मृत्युंजयकार शिवाजी सावंत ह्यांचे हे जन्मस्थान आहे.
आजरा पासून जवळच असलेली ठिकाणे :
- रामतीर्थ धबधबे : २ किमी-
निसर्गसौंदर्य पर्यटनस्थळ रामतीर्थ
‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या अनेक साहित्यकृतींत उल्लेख आलेल्या आजऱ्यापासून दोन कि़मी. अंतरावर असणाऱ्या रामतीर्थ या सुप्रसिद्ध ‘क’ वर्ग पर्यटनस्थळी नैसर्गिक सौंदर्याची मुक्त उधळण पाहावयास मिळते. कोल्हापूरपासून १00 किमी, दोन तास प्रवास, एस. टी. महामंडळाच्या बस जातात. राहण्याची सोय आहे. हॉटेलची संख्याही मोठी आहे. निधी अपुरा पडल्याने महादेव मंदिरासमोरील बांधकाम, पर्यटकांसाठी रॅम्प व किरकोळ कामे झाली
काही स्थानिक मंडळी लोकवर्गणी जमा करून इतर कामे करीत आहेत.येथे पर्यटकांमध्ये वाढ होत असली, तरीही प्राथमिक सुविधांचा अभावच आहे. यात्री निवासामध्ये पर्यटकांना थांबण्याची सोय करण्यात आली असली, तरी यात्री निवास बंद अवस्थेतच असल्याने अडचणीचे होत आहे. स्वच्छतागृहे वापराअभावी पडून आहेत. येथून पुढे आंबोली/ गोव्याला जाता येते.
- गडहिंग्लज : २१ किमी
- संकेश्वर (NH 4-राष्ट्रीय महामार्ग) : ३६ किमी
- निपाणी (NH 4-राष्ट्रीय महामार्ग) : ४४ किमी
- कोल्हापूर: ८४ किमी
- आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा): ३३ किमी
- सावंतवाडी: ६२ किमी
- पणजी: १२१ किमी
- बेळगाव: ५२ किमी
- उत्तूर:१८किमी
आजरा तालुकयातील पर्यटन स्थळे -
आजरा तालुकयातील निंगुडगे गावी अति प्राचीन महादेव अमृतेश्वर मंदिर आहे. मंदिरात नंदीची शोभनीय मूर्ती आहे,तसेच शक्ती गणेश,नवग्रह,अष्ट दिशा चक्र व कार्तिक स्वामी या मूर्ती व त्यावरील कलाकुसर खूपच सुंदर आहे अंतर १६ किलोमीटर
रामतीर्थ धबधबा -अंतर २ किलोमीटर
चित्री प्रकल्प - अंतर ८ किलोमीटर
आजरा तालुका म्हणजे निसर्गप्रेमी साठी एक नंदनवन आहे.बारा महिने निसर्गाने हिरवी शाल पांघरावी न पक्षी आणि प्राण्यांनी त्यावर नक्षी करावी असा हा तालुका .रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गर्द हिरवीगार झाडी,लाल माती,जागोजागी वाड्या,वस्त्या भाताची शेती हवेत हलकासा गारवा निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करावी असा हा तालुका.
=आजरा तालुक्यातील गावे
- देवकांडगाव
- होनेवाडी
- कासार कांडगाव
- उत्तुर
- मासेवाडी
- शिरसंगी
- किणे
- चाळोबावाडी
- भादवण
- जाधेवाडी
- खोराटवाडी
- मुमेवाडी
- आरदाळ
- हालेवाडी
- मडिलगे
- महागोंड
- झुलपेवाडी
- साळगाव
- पेरणोली
- सोहाळे
- हाजगोळी खु|
- हाजगोळी बु|
- पेद्रेवाडी
- कोवाडे
- पोळगाव
- गवसे
- वेळवट्टी
- देवर्डे
- दर्डेवाडी
- सुळेरान
- घाटकरवाडी
- श्रुंगारवाडी
- वाटंगी
- मलिग्रे
- जेऊर
- भावेवाडी
- चाफवडे
- मसोली
- खानापूर
- एरंडोळ
- वडकशिवाले
- बोलकेवाडी
- हत्तीवडे
- मेंढोली
- बाची
- बहिरेवाडी
- बेलेवाडी
- बुरुडे
- मुरुडे
- चिमणे
- दाभिल
- पेंढारवाडी
- वझरे
- आवंडी
- चितळे
- हरपवडे
- कोरीवडे
- सुलगाव
- लाकूडवाडी
- लाटगाव
- आल्याचीवाडी
- शेळप
- मेढेवाडी
- पारेवाडी
- हाळोली
- भादवणवाडी
- महागोंडवाडी
- यमेकोंड
- माद्याळ
- घाघरवाडी
- मासेवाडी
- खेडे
- कानोली