आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्यातर्फे सासवड या गावी आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन भरते. दरवर्षी आचार्य अत्र्यांच्या जन्मदिवशी म्हणजे १३ ऑगस्ट या तारखेला, किंवा तिच्या आजूबाजूच्या दिवशी हे एक किंवा दोन दिवसीय साहित्य संमेलन होते. संमेलनात इतर कार्यक्रमाबरोबर अत्र्यांच्या नावाने ठेवलेल्या साहित्य पुरस्कारांचे वितरणही होते. या संमेलनाचे प्रमुख संयोजक विजयराव कोलते, दशरथ यादव, रावसाहेब पवार हे आहेत...साहि्ित्यक पत्रकार यादव यांच्या नियोजनाचा त्यात मोठा वाटा असतो...
आत्तापर्यंत झालेली आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलने
- २१वे : १३-१४ आॅगस्ट २०१८, संमेलनाध्यक्षा डाॅ. अश्विनी धोंगडे
- २०वे : १३-१४ ऑगस्ट २०१७; संमेलनाध्यक्ष प्रवीण दवणे
- १९वे : १३-१४ ऑगस्ट २०१६; संमेलनाध्यक्ष मिलिंद जोशी
- १८वे : १३-१४ ऑगस्ट २०१५या काळात; संमेलनाध्यक्ष वात्रटिकाकार रामदास फुटाणे
- १७वे : १३ ऑगस्ट २०१४ला; संमेलनाध्यक्ष : पत्रकार मधुकर भावे
- १६वे : १३ ऑगस्ट २०१३ला; संमेलनाध्यक्ष : बाबा भांड
- १५वे : १३ ऑगस्ट २०१२ला; संमेलनाध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे
- १४वे : १३ ऑगस्ट २०११ला; संमेलनाध्यक्ष : राजन खान
- १३वे : १३ ऑगस्ट २०१०ला; संमेलनाध्यक्ष : उत्तम कांबळे
- १२वे : १३ ऑगस्ट २००९ला; संमेलनाध्यक्ष : विठ्ठल वाघ
- ११वे : १३ऑगस्ट २००८ला; संमेलनाध्यक्ष : रामचंद्र देखणे
- १०वे :
- ९वे :
- ८वे :
- ७वे :
- ६वे :
- ५वे :
- ४थे : १३ ऑगस्ट २००१; संमेलनाध्यक्ष : फ.मुं. शिंदे
- ३रे : १३ ऑगस्ट २०००;
- २रे :
- १ले : १३ ऑगस्ट १९९८
पहा : आचार्य अत्रे पुरस्कार, पुरस्कार; मराठी साहित्य संमेलने