आग्नेय किंवा दक्षिण-पूर्व ही दक्षिण व पूर्व ह्या प्रमुख दिशांच्या मध्यात असलेली एक उपदिशा आहे. अग्नेय या दिशेची देवता अग्नि असल्याने तिला आग्नेय असे नाव पडले आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या अग्नेय दिशेला स्वयंपाक व्यवस्था करण्याचा रिवाज आहे.
आठ दिशा | |
---|---|
उत्तर दिशा • ईशान्य दिशा • पूर्व दिशा • आग्नेय दिशा • दक्षिण दिशा • नैर्ऋत्य दिशा • पश्चिम दिशा • वायव्य दिशा |