आगरवाडी (सफाळे)
?आगरवाडी (सफाळे) महाराष्ट्र • भारत | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | .१४५३८ चौ. किमी |
जवळचे शहर | पालघर |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता | १,४१४ (२०११) • ९,७२६/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४०११०४ • +०२५२५ • एमएच४८ |
बोलीभाषा:आगरी |
आगरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला माकुणसार मार्गाने गेल्यावर माकुणसार चेकनाक्यावर डावीकडे काही अंतरावर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव ७ किमी अंतरावर आहे.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.उन्हाळ्यात येथे भाजीपाला लागवड केली जाते.
लोकजीवन
हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३७२ कुटुंबे राहतात. एकूण १४१४ लोकसंख्येपैकी ६९९ पुरुष तर ७१५ महिला आहेत. गावाची साक्षरता ९१.३२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९६.०१ आहे तर स्त्री साक्षरता ८६.७१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १०० आहे. ती एकूण लोकसंख्येच्या ७.०७ टक्के आहे. मुख्यतः आगरी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती आणि लहान प्रमाणात दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन ते करतात.श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदरपासून जेव्हा ढग गडगडाट करतात आणि विजा चमकत असतात तेव्हा पावसाच्या सरी कोसळत असलेल्या एका वेगळ्याच नैसर्गिक वातावरणात एक नैसर्गिक भाजी रानात उगवत असते तिलाच अळंबी संबोधले जाते. ही भाजी अत्यंत चवदार असते. ही भाजी आरोग्यासाठी चांगली असते.ही भाजी जेव्हा उगवते तेव्हाच लगेच काढावी लागते अन्यथा ती लगेच फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. पहाटे लवकर उठून ही भाजी शोधून फुलण्याअगोदर खुडून काढून साफ करून ती लगेचच बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते. आदिवासी बांधवाना पावसाळ्यात हा अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावर ह्या भाजीची विक्री आदिवासी समाजातील पुरुष, स्त्रिया आणि मुलेमुली करीत असतात. पालघर, बोईसर, मनोर, सफाळे, केळवे रोड, वाणगाव, डहाणू, वाडा, कुडूस, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी येथील बाजारपेठांमध्ये सुद्धा ही भाजी विक्रीसाठी उपलब्ध असते.[१]
नागरी सुविधा
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्शासुद्धा सफाळेवरून दिवसभर उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
दांडा,उसरणी, दहिसर तर्फे माहीम, टिघरे, आंबोडेगाव, कपासे, पारगाव, सोनावे, उछवली, सफाळे, कर्दळ ही जवळपासची गावे आहेत.
संदर्भ
१.https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२.http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
३
https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
४.
https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५.
http://tourism.gov.in/
६.
http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
७.
https://palghar.gov.in/
८.
https://palghar.gov.in/tourism/
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार दिनांक १८ सप्टेंबर २०२३