Jump to content

आकेगव्हाण

आकेगव्हाण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.


  ?आकेगव्हाण

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरबोईसर
जिल्हापालघर जिल्हा
लोकसंख्या७८४ (२०११)
भाषामराठी
सरपंच
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४०१४०४
• +०२५२५
• एमएच४८

भौगोलिक स्थान

हे गाव बोईसर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस बेटेगाव, मान,गुंडाळे, नागझरी मार्गाने २१ किमी अंतरावर वसलेले आहे.


हवामान

येथे पावसाळ्यात विपुल प्रमाणात पाऊस पडतो. हवामान समशीतोष्ण व दमट असते. उन्हाळ्यात हवा उष्ण असते. हिवाळ्यात हवेत भरपूर गारवा असतो.श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदरपासून जेव्हा ढग गडगडाट करतात आणि विजा चमकत असतात तेव्हा पावसाच्या सरी कोसळत असलेल्या एका वेगळ्याच नैसर्गिक वातावरणात एक नैसर्गिक भाजी रानात उगवत असते तिलाच अळंबी संबोधले जाते. ही भाजी अत्यंत चवदार असते. ही भाजी आरोग्यासाठी चांगली असते.ही भाजी जेव्हा उगवते तेव्हाच लगेच काढावी लागते अन्यथा ती लगेच फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. पहाटे लवकर उठून ही भाजी शोधून फुलण्याअगोदर खुडून काढून साफ करून ती लगेचच बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते. आदिवासी बांधवाना पावसाळ्यात हा अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावर ह्या भाजीची विक्री आदिवासी समाजातील पुरुष, स्त्रिया आणि मुलेमुली करीत असतात. पालघर, बोईसर, मनोर, सफाळे, केळवे रोड, वाणगाव, डहाणू, वाडा, कुडूस, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी येथील बाजारपेठांमध्ये सुद्धा ही भाजी विक्रीसाठी उपलब्ध असते.[] ह्या गावाला सूर्या कालव्याचे सिंचनासाठी पाणी पुरविण्यात येते आणि त्या पाण्यावर उन्हाळ्यात भातशेती केली जाते.[]

लोकजीवन

गावात १६१ कुटुंबे राहत असून त्यामध्ये ४०८ महिला व ३७६ पुरुष आहेत. गावाची साक्षरता ५२ टक्के आहे. पुरुष साक्षरता ६३ टक्के तर महिला साक्षरता ४१ टक्के आहे.

नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.

संदर्भ

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२.

http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार दिनांक १८ सप्टेंबर २०२३
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, बुधवार दिनांक २२ मे २०२४.