Jump to content

आकाश ठोसर

आकाश ठोसर
जन्म २४ फेब्रुवारी, १९९३ (1993-02-24) (वय: ३१)
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ २०१६ - सद्य
भाषा मराठी
प्रमुख चित्रपटसैराट

आकाश ठोसर (२४ फेब्रुवारी १९९३) हा मराठी चित्रपट अभिनेता आहे. नागराज मंजुळेंनी दिग्दर्शित केलेल्या व मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरलेल्या 'सैराट' या सिनेमामध्ये आकाशने परश्या (प्रशांत काळे)ची भूमिका साकारली होती.

कुस्तीची आवड असण्याऱ्याया आकाशचा जन्म पुणे येथे झाला. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधून झाले असून तो येथूनच ‘पदविका’चे शिक्षण पूर्ण करत आहे. आकाश जेंव्हा खेळामध्ये गर्क होता तेंव्हा सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या भावाने त्याचे छायाचित्र काढून नागराज मंजुळेना पाठवले. नागराज मंजुळे यांना आकाशचा चेहरा आवडला आणि त्याला आपल्या चित्रपटात घेतले. आणि तेथूनच त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.[]

आकाश नुकताच 'नेटफ्लिक्स'च्या लस्ट स्टोरीज ह्या चित्रपटामध्ये राधिका आपटेसोबत तेजस नावाच्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत पाहायला मिळाला.[]

चित्रपट

वर्षशीर्षकभाषापात्रटीप
२०१६सैराटमराठीप्रशांत काळे (परश्या)नायकाची भूमिका
२०१७एफयू (फ्रेंडशिप अनलिमिटेड)मराठीसाहील माहाजन

संदर्भ

  1. ^ "'सैराट'च्या परशाबद्दलच्या काही रंजक गोष्टी..."
  2. ^ Ramnath, Nandini. "'Lust Stories' review: Lots of talk and some show". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2018-07-25 रोजी पाहिले.