आकाश क्षेपणास्त्र
आकाश | |
---|---|
प्रकार | जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र |
राष्ट्र | भारत |
उत्पादनाचा इतिहास | |
Designer | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था |
उत्पादक | आयुध निर्मिती बोर्ड भारत डायनामिक्स भारत इलेक्ट्रॉनिक्स |
उत्पादन | २००९ - |
किती तयार | ३००० क्षेपणास्त्रे[१] |
तपशील | |
वजन | ७२० किलो (१,६०० पौंड) |
लांबी | ५७८ सेंमी (१८.९६ फूट) |
व्यास | ३५ सेंमी (१.१५ फूट) |
युद्धाग्र | अत्यंत स्फोटक विखंडन दिशात्मक बॉम्ब |
Warhead वजन | ६० किलो (१३० पौंड) |
विस्फोट तंत्र | रडार प्रॉक्झिमिटी फ्युज |
पंखांची लांबी | २५४ मिलीमीटर |
क्रियात्मक पल्ला | ३० किमी |
उड्डाणाची कमाल उंची | १८ किमी (५९,००० फूट) |
गती | माक ३ |
दिशादर्शक प्रणाली | आदेश मार्गदर्शन |
आकाश नावाचे क्षेपणास्त्र
भारताच्या संरक्षण सामग्रीत असलेले हे आकाश क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याचा पल्ला ६० किलोमीटरपर्यंत आहे. हे ५५ किलो स्फोटके घेऊन प्रवास करू शकते.
‘आकाश’चे वजन ७२० किलो असून त्याची लांबी ५.२ मीटर आहे. या क्षेपणास्त्रात अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. ध्वनीच्या साडेतीनपट वेगाने हे क्षेपणास्त्र प्रवास करते. त्याला वेळ पडल्यास जागा बदलणाऱ्या मोबाईल लॉंचरवरून डागण्याची क्षमता भारताने विकसित केली आहे.
इतिहास
भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था- (डीआरडीओने) हे क्षेपणास्त्र तयार केले आहे. त्यासाठी इ.स. १९९० पासून संशोधन कार्य सुरू होते आणि सरतेशेवटी इ.स. १९९७मध्ये याची चाचणी यशस्वी झाली.
संदर्भ
- ^ "इंडियन आर्मी ऑर्डर्स आकाश मिसाईल सिस्टिम". 2017-08-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-28 रोजी पाहिले.