आउश्वित्झ छळछावणी
आउश्वित्झ छळछावणी (मराठी लेखनभेद: ऑश्विझ छळछावणी) पोलंडमधील ओश्फिन्चिम ह्या शहराजवळ नाझी जर्मनीने उभारलेली एक मोठी छळछावणी होती. अजूनही येथे तत्कालीन छळछावणीचे अवशेष जतन केले आहेत व छळछावणीत हौतात्म्य पत्करलेल्यांचे स्मारक आहे. या ठिकाणी शेकडो ज्यू, युद्धबंदी, पकडलेले हेर, राजकीय विरोधक यांना बंदी करून ठेवण्यात आले होते. त्यांचा मुख्य उपयोग युद्धकालात सामग्री उत्पादनासाठी लागणारे कामगार म्हणून केला गेला. जे श्रम करण्यास सक्षम होते, अश्यांनाच जिवंत ठेवले जाई. इतर लोकांना विविध प्रकारे ठार मारले जाई. विषारी वायूंच्या कोठडीमध्ये कोंडून ठार मारण्याची जागा अवशेषात जतन केली आहे.येथे ११ लाख व्यक्तींना ठार मारले गेले.[१]
वैद्यकीय संशोधने
नाझी डॉक्टरनी युद्धकैदी असलेल्या ज्यूंवर अनेक प्रयोग केले. हे प्रयोग अतिशय भयानक होते.हे प्रयोग माणुसकीला काळिमा फासणारे होते. काहीकाही प्रयोग तर कां केले असा प्रश्न निर्माण होतो.
खाऱ्या पाण्याचे प्रयोग
नाझीना हे बघायचे होते की, समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते का? यासाठी त्यानी कैद्यांना समुद्राचे पाणी बळजबरीने पाजले. त्यानी या कैद्याना समुद्राचे पाणीच पिण्यासाठी भाग पाडले. त्यानी ह्याची काळजी घेतली की कैद्याना ताजे पाणी कुठल्याही स्त्रोतातून मिळू शकणार नाही. कैद्याना अतिशय त्रास आणि वेदना सहन कराव्या लागल्या. सर्वच कैद्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले. कैदी इतके तहानलेले होते की ते ताजे पाणी मिळण्याच्या आशेने नुकत्याच पुसलेल्या फरश्या चाटत होते. १०० ज्यू कैद्यांना या प्रयोगात सामील करण्यात आले होते. हे सर्व कैदी मरण पावले
थंड पाण्याचे प्रयोग
माणूस किती कमी तापमानापर्यंत जिवंत राहू शकतो ह्या प्रश्नाचे उत्तर नाझी डॉक्टरांना हवे होते. हे शोधून काढण्यासाठी त्यांच्याकडे जू कैदी होते. त्यानी अनेक कैद्यांना थंड पाण्याच्या टबात ठेवले आणि हळू हळू तापमान कमी करत गेले. ज्या तापमानाला माणूस मरतो ते तापमान त्यानी लिहून ठेवले.
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ "ऑश्विझ मेमोरीअल ॲंड म्युझियम" (इंग्लिश भाषेत). 2011-10-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)