Jump to content

आई समजून घेताना

आई समजून घेताना हे उत्तम कांबळे या यांचे आत्मचरित्र आहे. हे मराठीतील आंबेडकरी लेखक आहेत.

आई समजून घेताना' हे उत्तम कांबळेंचे पुस्तक वाचताना आणखी एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी ताणत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गेल्यामुळे आठवणींना अनुक्रमणिका नाहीत. लेखकाच्या आयुष्यात प्रकाशवाटा घडविण्यासाठी आयुष्यभर राबलेली लेखकाची 'अक्का' स्वतःसाठी वर्तमान घडवू शकली नाही ही लेखकाची तक्रार. स्वतः अतिशय कष्ट घेऊन मुलांच्या वारेमाप खर्चामुळे अस्वस्थ होणारी आई...'तुझ्या लहानपणी आपन दोघं रोजगाराला गेलो आणि दिवसभर राबलो तर फक्त चार-पाच रुपये मिळायचे. इथं तुझं पोरगा तर दहा रुपयाच्या चॉकलेटचा एकच घास करतो. तुला मागचं दिवस कसं आठवत नाहीत' लेखकाला वारंवार भूतकाळात नेणारी लेखकाची आई. भाकरीच्या तुकड्यासाठी लहाणपणाची लाचारी आठवायला लावायची, तोंडातून लाळ गळेपर्यंत विनवण्या आठवायला लावायची. माणसाच्या दुखा:चे कारण इच्छाच असते हे तत्त्वज्ञान सांगणारी आईच असते....लेखक आणि त्यांच्या आईचा संवाद सतत तुसड्यासारखा दिसतो. उदा. लेखकाने विचारले 'जेवलीस का?' ती म्हणायची, 'ढकलंलं दोन तुकडं पोटात'. 'कशी आहेस?' असे विचारल्यावर म्हणायची 'कसंचं काय, मरण जवळ आलंय'. 'डॉक्टरांकडे जाऊया का? 'डॉक्टर का कुणाचं मरण कायमचं रोखतो?' असे संवाद पुस्तकात जागोजागी दिसतात. अर्थात ती असे का बोलते त्याचा शोध लेखक घेतांना त्यांना जाणवते की, आईने अपार घेतलेले कष्ट...तिच्यासमोर आजच्या सुखात भूतकाळातील भाकरी मिळवण्याची युद्धगाणी आठवायची आणि लेखक 'आई' ने घेतलेल्या कष्टाच्या आठवणीत रमून जातो. पैसे नसल्यामुळे डोक्याच्या केसांचा पुंजका विकुन मिळालेल्या पैशातून बुड्ढी के बाल (मिठाई ) मुलांना देणारी आई. फ्लॅट मधे राहत असल्यामुळे लेखकाच्या आईला बोलण्यासाठी जेव्हा कोणी मिळत नाही तेव्हा रस्त्यावर कोणत्याही बाईमाणसाशी गप्पा मारणारी लेखकाची आई. असे करतांना ऑकवर्ड वाटणारा लेखक. टी. बी. झाल्याचे कळलेले पाहून स्वतःहून नातवंडापासून दूर राहणारी लेखकाची आई. या आणि अशा कितीतरी प्रसंगातून 'आई समजून घेताना' लेखकाची दमछाक होते.

प्रकाशन

लोकवाङमय गृह