Jump to content

आइन्स्टाइन नेपोलियन

आइन्स्टाइन नेपोलियन ( १६ ऑगस्ट १९८९) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करणारा आघाडीचा फलंदाज आहे. तो चेन्नई सुपर किंग्जसाठी इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो.

आइंस्टीनने फेब्रुवारी २००७ मध्ये सिकंदराबाद येथे रणजी वन डे ट्रॉफीच्या सामन्यात तमिळनाडुसाठी केरळविरुद्ध खेळत पदार्पण केले. त्याने फलंदाजी सुरू करताना ९२ धावा केल्या आणि मुरली विजयसोबत भागीदारीने पहिल्या विकेटसाठी २०३ धावा केल्या. याने त्यांचा ४६ धावांनी विजय झाला. एक महिन्यानंतर, तो त्याच स्पर्धेत आसाम विरुद्ध खेळला पण त्यावेळी त्याने केवळ १ धाव घेतली.