Jump to content

आइ नदी

आइ नदी अथवा ऐए नदी अथवा अइ नदी (असमीया भाषा: আই নদী) ही भारताच्या आसाम राज्यामधील एक नदी आहे. आइ नदी भूतानमध्ये उगम पावून तीस भूतान मध्ये अनेक छोट्या उपनद्या मिळतात. खडकाळ प्रदेशांतून पूर्वेस गोवालपारा चिरांग आणि बॉॅंगाइगांव या जिल्ह्यांतून वहात जाऊन बंगपारी येथे मनास (ब्रम्हपुत्राला मिळणारी एक नदी) नदीला मिळते. नदीची लांबी ९५ मैल आहे. त्यातील साधारणत: 64 miles/ 103 km आसाम राज्यात आहे. आइ नदीत चार टन पर्यंत ओझ्याच्या होड्या चालतात.[]

Guwahati-Rangiya-New Bongaigaon Mainline of Northeast Frontier Railway Bijni आणि Patiladoha स्टेशनांच्या दरम्यान आइ नदी क्रॉस होते.

नदीचा वारंवार पात्र बदल

आइ नदीस (भू)माती स्खलनाचे मोठेच प्रमाण आहे. आसामातील बऱ्याच नद्यांचे पात्र नद्यांमधून येणाऱ्या गाळाने वर्षोगणिक बदलत असते; (भली मोठी नदीच्या नदी नवीन ठिकाणाहून वाहू लागते) तसे आइ नदीचेही बदलते असते. अशाच प्रकारात इ.स. २००५ मध्ये आइ नदीने प्रवाह बदलून रेल्वे ट्रॅकने अडवलेल्या ठिकाणी पोहोचून रेल्वे मार्गालगत वाहात राहून पुन्हा जुन्या प्रवाहात गेली. तेव्हा बदललेल्या प्रवाहाचे तोंड बांध घालून केले गेले. रेल्वे रूळालगत जे साचलेले पाणी राहीले त्यात मत्स शेती केली जाऊ लागली.प्रवहमुले सर्खा पत्र बद्ल्त जते.

शब्दार्थ

असमिया আই आइ मधील ই हे अक्षर ऱ्हस्व इ आहे. तरी सुद्धा असमिया আই आइ चा अर्थ मात्र मराठी आई प्रमाणेच माता असा होतो.

संदर्भ

  1. ^ केतकर, श्रीधर. अइ. २४ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले. More than one of author-name-list parameters specified (सहाय्य)