Jump to content

आंह्वी

आंह्वी
安徽省
चीनचा प्रांत

आंह्वीचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
आंह्वीचे चीन देशामधील स्थान
देशFlag of the People's Republic of China चीन
राजधानीहफै
क्षेत्रफळ१,३९,४०० चौ. किमी (५३,८०० चौ. मैल)
लोकसंख्या६,१३,५०,०००
घनता४४० /चौ. किमी (१,१०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CN-AH
संकेतस्थळhttp://www.ah.gov.cn/

आंह्वी (देवनागरी लेखनभेद: आंहुई, आंह्-वी; सोपी चिनी लिपी: 安徽; फीन्यिन: Ānhuī ) हा चीन देशातला पूर्वेकडील प्रांत आहे. यांगत्से व ह्वायहे नद्यांच्या खोऱ्यांमध्ये वसलेल्या आंह्वीच्या सीमा पूर्वेस ज्यांग्सू, आग्नेयेस च-च्यांग, दक्षिणेस च्यांग्शी, नैऋत्येस हूपै, वायव्येस हनान व उत्तरेस शांतोंग या प्रांतांना लागून आहेत. हफै ही आंह्वीची राजधानी आहे.

भूगोल

आंह्वी प्रांताच्या उत्तरेकडचा भूप्रदेश सखल असून तो उत्तर चिनी मैदानाचा भाग म्हणून गणला जातो. प्रांताच्या मध्यभागातून ह्वायहे नदी वाहते. आंह्वीच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशात व मध्य आंह्वीतल्या ह्वायहे नदीच्या खोऱ्यात दाट वस्ती आहे. प्रांताच्या दक्षिणेकडील भाग डोंगराळ असून त्यातून यांगत्से नदी वाहते. आंह्वीच्या नैऋत्येकडील भूप्रदेशात ताब्ये पर्वतरांग पसरली असून तिच्यापासून फुटणाऱ्या डोगरांच्या व लहानलहान टेकड्यांच्या माळा आंह्वीच्या आग्नेय भागापर्यंत पसरल्या आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत