आंभण
?आंभण महाराष्ट्र • भारत | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | .३०५५६ चौ. किमी |
जवळचे शहर | पालघर |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता | ६६० (२०११) • २,१६०/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४०१४०३ • +०२५२५ • एमएच४८ |
बोलीभाषा:आदिवासी कातकरी |
आंभण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
पालघर रेल्वे स्थानकातून पूर्वेस मनोर मार्गाने २१ किमी अंतरावर हे गाव वसलेले आहे.वाटेत वाघोबा मंदिर, चहाडे गाव, सूर्यानदी,मासवण गाव लागतात.मनोर गावाजवळ डाव्या बाजूला फुटणारा फाटा आंभण गावात जातो.
हवामान
उन्हाळ्यात येथे फारच उष्ण हवामान असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. हिवाळ्यात शीतल वारे वाहत असल्याने वातावरण गार असते.श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदरपासून जेव्हा ढग गडगडाट करतात आणि विजा चमकत असतात तेव्हा पावसाच्या सरी कोसळत असलेल्या एका वेगळ्याच नैसर्गिक वातावरणात एक नैसर्गिक भाजी रानात उगवत असते तिलाच अळंबी संबोधले जाते. ही भाजी अत्यंत चवदार असते. ही भाजी आरोग्यासाठी चांगली असते.ही भाजी जेव्हा उगवते तेव्हाच लगेच काढावी लागते अन्यथा ती लगेच फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. पहाटे लवकर उठून ही भाजी शोधून फुलण्याअगोदर खुडून काढून साफ करून ती लगेचच बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते. आदिवासी बांधवाना पावसाळ्यात हा अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावर ह्या भाजीची विक्री आदिवासी समाजातील पुरुष, स्त्रिया आणि मुलेमुली करीत असतात. पालघर, बोईसर, मनोर, सफाळे, केळवे रोड, वाणगाव, डहाणू, वाडा, कुडूस, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी येथील बाजारपेठांमध्ये सुद्धा ही भाजी विक्रीसाठी उपलब्ध असते.[१]
लोकजीवन
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार आंभण गावाची लोकसंख्या ६६० आहे त्यापैकी ३१८ पुरुष तर ३४२ महिला आहेत. गावात १३१ कुटुंबे राहतात.एकूण लोकसंख्येच्या १२.७३ टक्के ० ते ६ वर्षाखालील लहान मुलांची संख्या आहे.गावाची साक्षरता ६९.६२ टक्के आहे. पुरुष साक्षरता ८३.९९ टक्के तर स्त्री साक्षरता ५५.९३ टक्के आहे. गावात मुख्यतः आदिवासी समाजातील लोक राहतात. मुख्य व्यवसाय भातशेती असून शेतमजुरी तसेच जंगलकाम,वीटभट्टीवर मजुरी हे उत्पन्नाचे साधन आहे.
नागरी सुविधा
गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, रस्ते वीजपुरवठा इत्यादी गोष्टी ग्रामपंचायतीतर्फे पाहिल्या जातात.
जवळपासची गावे
आंभण गावच्या आजूबाजूच्या परिसरात दामखिंड, कोंढण, आवधण, कोसबाड, नांदगाव तर्फे मनोर, बांधण, लोवारे, काटाळे, वासरोळी, वाकडी, टाकवहाळ ही गावे आहेत.
संदर्भ
https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार दिनांक १८ सप्टेंबर २०२३