आंबोळगड (राजापूर)
?आंबोळगड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | राजापूर |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
आंबोळगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे आंबोळगड व यशवंतगड. "मुसाकाजी" या प्राचीन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला. रत्नागिरी पासून ५७ किमी आणि राजापूर पासून ३६ किमी अंतर आहे. गाव तिन्ही बाजूस अरबी समुद्राने वेढलेला असून एका बाजूस पठाराच्या दिशेने नाटे या गावाशी जोडलेला आहे.
हवामान
इतर कोकण प्रमाणे पावसाळ्यात भरपूर पाऊस आणि थंडीत खूप थंडी असते. उन्हाळ्यात उष्ण व कोरडे हवामान असते.
लोकजीवन
आंबोळगड गाव हे १०० टक्के हिंदू धर्मीय गाव असून गावातील बहुसंख्य लोकवस्ती ही स्थानिक "भंडारी" (९८%) समाजाची आहे. येथील आडनावे - पारकर, पांगले, नार्वेकर, आंबोळकर, खानविलकर, वाडेकर, गवळी ही आहेत. "गणेश उत्सव" व "होळी उत्सव" या सणांस मुंबई, पुणे येथे कामानिमित्त स्थायिक झालेले चाकरमनी आपल्या गावी येतात.
प्रेक्षणीय स्थळे
१) आंबोळगड किल्ला - आंबोळगड गावात एक पडीक किनारी दुर्ग आहे. किल्यात एक तुटलेली तोफ या व्यतिरिक्त येथे काही नाही. ना तटबंदी न वाड्याचे अवशेष. आंबोळगड हा उंचवट्यावर वसवलेला किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२०० चौरस मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र व उत्तर आणि पश्चिमेस खंदक आहे. किल्ल्याची अवस्था फारच बिकट आहे. समुद्राच्या बाजूची काही तटबंदी शाबूत आहे. याशिवाय किल्ल्यात एक चौकोनी विहीर व वाड्यांची जोती आहेत.
२) श्री गगनगिरी महाराज मठ - किल्ल्याजवळच्या सड्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे. मठ समुद्र कड्यावर असून येथे समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. समोरच एक तुटलेल्या समुद्रीकडा सर्वांच्या नजर खिळवून ठेवतो. संध्याकाळी मावळत्या सूर्याचे मनमोहक दृश्य पाहून डोळ्यांचे पारणे फेटते.
3) दोन मोठे समुद्र किनारे असल्याने रिसाॅर्ट हाॅटेले आहेत, वाॅटर स्पोर्ट्स सुरू होत आहेत.
4) किल्ल्यासमोरच स्वयंभू "श्री गणेश मंदिर" असून जागृत "श्री महापुरुष देवस्थान" आहे. गणेश मंदिराच्या मागच्या बाजूस समुद्रकिनारी खडकात स्वयंभू "श्री जटेश्वर देवस्थान" आहे.
5) आंबोळगड गावाला दोन सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारे लाभले आहेत. राघोबाची वाडीस लागून असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यास "गोडिवणे किनारा" म्हणतात. येथे अनेक पर्यटक भेट देतात.
नागरी सुविधा
जवळपासची गावे
नाटे ग्रामपंचायत- ४ किमी
तालुका- राजापूर ३६ किमी
जिल्हा- रत्नागिरी ५७ किमी
संदर्भ
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/