Jump to content

आंबेमोहर

आंबेमोहर हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाट प्रदेशाच्या पायथ्याशी उगवला जाणारा एक सुगंधी तांदूळाचा प्रकार आहे.

इतिहास आणि व्युत्पत्ती

आंबेमोहर या शब्दाचा अर्थ मराठी भाषेतील आंबा मोहोर असा आहे जो महाराष्ट्र राज्यात बोलला जातो जेथे या जातीचा उगम झालेला आहे. तांदळाला आंब्याच्या मोहोराची आठवण करून देणारा तीव्र सुगंध असतो.[] या भागात भाताची लागवड फार पूर्वीपासून केली जात आहे. एक शतकापूर्वी पुणे जिल्ह्यातील मुळशी भागात सुमारे ५४००० टन आंबेमोहर जातीच्या तांदळाचे उत्पादन झाले होते.[]

उत्पादन आणि लागवड

भारतातील महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाट प्रदेशाच्या पायथ्याशी या जातीचे पीक घेतले जाते.[] हा कमी उत्पन्न देणारा तांदूळ आहे (१.९ टन प्रती हेक्टर). सुप्रसिद्ध बासमती तांदळाच्या तुलनेत हा तांदूळ लहान आकाराचा असतो. याचा आकार 5.5 मिमी उभा आणि २.२ मीमी रुंद असतो. परंतु दोन्ही जातींमध्ये समान प्रमाणात सुगंध आहे.[] हा सुगंधी तांदूळाच्या प्रकारात मोडतो उदा बासमती.[] हा तांदूळ कमी शिजवलेल्यावर सहजपणे तुटतो आणि एकत्र चिकटकू शकतो. 

संबंधित वाण

आंबेमोहर हे भाताच्या इतर जातींच्या तुलनेत कमी उत्पादन देणारे आहे, मुख्यत्वे ते रोगास बळी पडत असल्यामुळे. अंबेमोहरापसून इंद्रायणी नावाची संकरित प्रजाती १९८७ मध्ये प्रसिद्ध झाली.[] लोणावळ्याजवळील भात संशोधन केंद्राने ती जात विकसित केली आहे.[] फुले मावळ आणि फुले समृद्धी या तांदळाच्या नवीन जाती तयार करण्यासाठी इंद्रायणीमध्येही बदल करण्यात आले आहेत.[]

लागवडीचा भाग

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याचे ठिकाण

आंबेमोहर तांदळाचा वापर तांदूळ आणि दुध यांच्यापासून जाड सूप (भातची पेज) तयार करण्यासाठी वापरला जातो. स्थानिक पातळीवर प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध लोक आणि रुग्णांना ही पेज दिली जाते. धार्मिक आणि लग्न समारंभातही हा तांदूळ वापरला जातो. पुणे जिल्ह्यातील मुळशी भागात, मकर संक्रांती सणाच्या वेळी तयार केलेला 'वाफोल्या' - एक पारंपारिक खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो. हा तांदूळ मऊ इडली आणि कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी वापरला जातो. याचा वापर कुरमुरे बनवण्यासाठी देखील केला जातो. तांदळाचा कोंडा तेल काढण्यासाठी किंवा मशरूमच्या लागवडीसाठी वापरला जातो.[]

भौगोलिक संकेत

सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका उपविभागाला आंबेमोहरचे भौगोलिक संकेत देण्यात आले आहेत.[१०]

तोतया तांदूळ

आंबेमोहर नियमितपणे पिकवणारे शेतकरी आता दुर्मिळ झाले आहेत. उत्पादन खर्च आणि विक्री खर्चही जास्त असतो. त्यामुळे, महाराष्ट्रातील किरकोळ विक्रेते, जास्त नफा मिळविण्यासाठी मूळ आंबेमोहराच्या ऐवजी त्याच्या सारखा दिसणारा तांदूळ विकतात. यामुळे आंबेमोहरचे उत्पादन करणारे शेतकरी अजून निरुत्साहित झाले आहेत. आंध्र प्रदेशातील जीरा सांभर तांदूळ आणि मध्य प्रदेशातील जावाफुल हे किरकोळ विक्रेत्यांकडून विकले जाणारे सर्वात लोकप्रिय आंबेमोहर सारखे दिसणारे तांदूळ आहेत.[११]

हे सुद्धा पहा

  • बासमती तांदूळ
  • चमेली भात
  • तांदळाच्या जातींची यादी
  • ओरिझा सॅटिवा
  • वेहणी भात

संदर्भ

  1. ^ Samuel S. Gnanamanickam (14 July 2009). Biological Control of Rice Diseases. Springer Science & Business Media. p. 7. ISBN 978-90-481-2465-7.
  2. ^ Chowdhury, A.R., 2013. Subalternity, State-Formation and Movements against Hydropower Projects in India, 1920-2004 (Doctoral dissertation).
  3. ^ Singh, A.K., 2014. Probable Agricultural Biodiversity Heritage Sites in India: XX. The Konkan Region. Asian Agri-History, 18(3)|
  4. ^ Aromatic Rices. Int. Rice Res. Inst. 2000. pp. 8–. ISBN 978-81-204-1420-4.
  5. ^ Aromatic Rices. Int. Rice Res. Inst. 2000. pp. 8–. ISBN 978-81-204-1420-4.
  6. ^ Aromatic Rices. Int. Rice Res. Inst. 2000. pp. 8–. ISBN 978-81-204-1420-4.
  7. ^ Mahatma Phule Agricultural University's
  8. ^ Shailesh D. KUMBHAR; Pawan L. KULWAL (2015). "Genetic Diversity and Population Structure in Landraces and Improved Rice Varieties from India". Rice Science. 22 (3): 99–107. doi:10.1016/j.rsci.2015.05.013. 15 April 2019 रोजी पाहिले.
  9. ^ Government of India (2016). "Government of India Geographical Indications" (PDF). Government of India Geographical Indications. 88 (July 28).
  10. ^ Geographical Indications Registry. "Ambemohar Rice". Geographical Indications Registry. Government of India. 15 April 2019 रोजी पाहिले.
  11. ^ Bhosale, Jayashree (Jan 31, 2012). "Consumers pay premium price for the look alike of the regional rice varieties". Economic Times. October 8, 2018 रोजी पाहिले.