आंबिवली (विक्रमगड)
?आंबिवली महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ०.३९६ चौ. किमी |
जवळचे शहर | विक्रमगड |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता | ९१७ (२०११) • २,३१६/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | वारली |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/४८ /०४ |
आंबिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १६९ कुटुंबे राहतात. एकूण ९१७ लोकसंख्येपैकी ४८१ पुरुष तर ४३६ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदरपासून जेव्हा ढग गडगडाट करतात आणि विजा चमकत असतात तेव्हा पावसाच्या सरी कोसळत असलेल्या एका वेगळ्याच नैसर्गिक वातावरणात एक नैसर्गिक भाजी रानात उगवत असते तिलाच अळंबी संबोधले जाते. ही भाजी अत्यंत चवदार असते. ही भाजी आरोग्यासाठी चांगली असते.ही भाजी जेव्हा उगवते तेव्हाच लगेच काढावी लागते अन्यथा ती लगेच फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. पहाटे लवकर उठून ही भाजी शोधून फुलण्याअगोदर खुडून काढून साफ करून ती लगेचच बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते. आदिवासी बांधवाना पावसाळ्यात हा अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावर ह्या भाजीची विक्री आदिवासी समाजातील पुरुष, स्त्रिया आणि मुलेमुली करीत असतात. पालघर, बोईसर, मनोर, सफाळे, केळवे रोड, वाणगाव, डहाणू, वाडा, कुडूस, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी येथील बाजारपेठांमध्ये सुद्धा ही भाजी विक्रीसाठी उपलब्ध असते.[१]
नागरी सुविधा
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
शिळशेत, नाळशेत,केव, वडापोळी, सावरोळी,इंदगाव, वासुरी, उटावळी, भानापूर, बास्ते,म्हासरोळी ही जवळपासची गावे आहेत.आंबिवली ग्रामपंचायतीमध्ये आंबिवली, ब्राह्मणगाव, आणि सावरोळी ही गावे येतात.
संदर्भ
१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
७. https://palghar.gov.in/tourism/
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार दिनांक १८ सप्टेंबर २०२३