Jump to content

आंब

आंब ही हरभरा रोपाच्या पानावर हिवाळ्यात तयार होणारा एक द्रव पदार्थ आहे. हा चवीला आंबट असतो. या पदार्थामुळे हिवाळ्याच्या सकाळी पाने हरभऱ्याची पाने ओलसर जाणवतात. हरबऱ्याच्या आंबीत मोठ्या प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. बाजारात आंब न काढलेला हरभरा क्वचित विक्रीला येतो.

गोळा करण्याची पद्धती

संध्याकाळी एक स्वच्छ कापड हरभऱ्याच्या शेतावर अंथरून ठेवतात. पहाटे दव पडते तेव्हा पानावरून ओघळून आंब कापडावर येते व ते कापड ओले होते. ते कापड पिळून आंब मिळवतात.

उपयोग

आंब हा पोटदुखीवर उपाय आहे अशी समजूत आहे.

हरभऱ्याची कोवळी पाने खुडून न धुता त्याची भाजी करतात. या भाजीत आंबेचे सर्व गुण असतात. हरभऱ्याची पाने नंतर वापरण्यासाठी वाळवूनही ठेवता येतात.