Jump to content

आंध्र प्रदेश एक्सप्रेस

आंध्र प्रदेश एक्सप्रेस

आंध्र प्रदेश एक्सप्रेस ही तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद आणि भारताची राजधानी नवी दिल्ली यांना जोडणारी दक्षिण मध्य रेल्वेची वेगवान गाडी होती. १५ नोव्हेंबर २०१५ रोजी तिचे नाव बदलून तेलंगणा एक्सप्रेस असे ठेवण्यात आले.

भारतीय रेल्वेने या गाडीला हैदराबाद-नवी दिल्ली पर्यंतच्या प्रवासासाठी १२७२३ आणि परतीच्या प्रवासासाठी १२७२४ असे क्रमांक दिलेले आहेत. १९७६ मध्ये सर्वप्रथम ही सेवा सुरू करण्याचे श्रेय मधू दंडवते यांना दिले जाते.

सुरुवात

१९७८ मध्ये आंध्र प्रदेश एक्सप्रेसला वरील अंतर कापण्यासाठी २३ तास लागत होते. पण त्यानंतर हळूहळू थांबे वाढल्यामुळे वरील कालावधी २७ तासापर्यंत वाढत गेला. ही एक्सप्रेस चालू होण्यापूर्वी या मार्गावरील गाडयांचे मार्ग एकेरी होते, १६७० कि.मी. पैकी जवळजवळ ३०० कि.मी. मार्ग एकेरी होता.

भारतीय रेल्वेकडून या एक्सप्रेस गाडीची सेवा सुरू झाली त्यावेळी १४ डब्यांची गाडी २६०० एचपी एएलसीओ क्षमतेच्या डिझेल इंजिनावर चालत होती. १९८१ मध्ये ५२०० एचपी २ एएलसीओ (डब्ल्यूडीएम२) इतक्या क्षमतेची डिझेल इंजिन वापरून २१ डब्यांना चालविले जाऊ लागले. या दुप्पट वाढीव क्षमतेमुळे इटारसी आणि नागपूर मधील ३०० कि.मी. अंतराच्या डोंगराळ भागामध्ये ’आंध्रप् रदेश एक्सप्रेस’ ही गाडी चालविणे सहज शक्य झाले आहे. या गाडीत खान पान सेवा आहे.

आंध्र प्रदेश एक्सप्रेसच्या मार्गावरील लोहमार्गाखाली बहुतांश सिमेंटचे स्लीपर्स आहेत. गाडीला सहसा आधुनिक इलेक्ट्रिक इंजिन जोडले जाते. ( डब्लयूएपी -७ / डब्लयूएपी – १ / डब्लयूएपी ४). त्याच्या साहाय्याने २४ डबे (७ वातानूकूलित डब्यांसह ) चालविले जातात.[] अत्याधुनिक सिग्नल आणि संपर्क यंत्रणेमुळे वाहनचालकांचा वाहतूक नियंत्रकाशी सतत संपर्क असतो. परंतु असे असूनही प्रवासाचा कालावधी अद्यापपर्यत कमी झालेला नाही.

’आंध्र प्रदेश एक्सप्रेस’ची ही सेवा सुरू झाल्यापासून म्हणजेच १९७८ ते १९९० पर्यंत तिला झांशी, भोपाळ, नागपूर, बल्लारशाह आणि काझीपेठ असे एकूण ५ थांबे होते. त्यानंतरच्या कालावधीमध्ये मात्र मधले थांबे वाढवून प्रवासाचा कालावधी २७ तासांपर्यंचा वाढविण्यात आला.

वेळापत्रक

ही गाडी नवी दिल्ली वरून रोज संध्याकाळी १७. ३० ला निघून दुसऱ्या दिवशी १९.५० पर्यंत हैद्राबाद डेक्कनला पाहोचते. परतताना सकाळी ०६.२५ ला हैद्राबादवरून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.०५ ला ही गाडी दिल्लीला पाहोचते. १६७७ कि.मी. एवढे अंतर २६ तास ३० मिनिटांमध्ये कापले जाते. त्यामुळे गाडीचा सरासरी वेग ताशी ६२ कि.मी.इतका पडतो.. आंध्र प्रदेश राज्यातील थांब्यांवर ही गाडी बराच वेळ थांबते परंतु नागपूर आणि भोपाळ च्या दरम्यान गाडी न थांबता धावत असते.[][][]

आंध्र प्रदेश एक्सप्रेसच्या वेळापत्रकाचा तक्ता[][]
स्टेशन नांव संकेतांक १२७२४ मूळ स्थानकापासून
अंतर (कि.मी.)
दिवस १२७२३ मूळ स्थानकापासून
अंतर (कि.मी.)
दिवस
आगमन गंतव्य आगमन गंतव्य
न्यू दिल्लीएनडीएलएसमूळ स्थानक१७: ३००९:०५अंतिम थांबा१६७७
हजरत निजामुद्दीनएनझेडएमथांबा नाहीथांबा नाही० ८:३ ८० ८:४०१६७०
मथुरा जं.एमटीजे१९:२ ८१९: ३०१४१०६:०६०६:० ८१५ ३६
आग्रा कॅन्टॉन्मेंटएजीसी२०: ३७२०:४०१९५०५:२००५:२ ३१४ ८२
ग्वाल्हेर जं.जीडब्लयूएल२२:००२२:० ३३१३० ३:२९३: ३२१ ३६४
झांशी जं.जेएचएस२ ३:३०२ ३:३ ८४१००२:० ८०२:१६१२६७
भोपाळ जं.बीपीएल० ३:२०० ३: ३०७०१२१:५०२२:००९७६
नागपूर जं.एनजीपी०९:४००९:५०१०९०१५:४५१५:५५५ ८७
चंद्रपूरसीडी१२:२४१२:२६१२८७१२:५४१२:५५३९०
बल्लारशहा जं.बीपीक्यू१ ३:२०१ ३: ३०१३०११२:२५१२: ३५३७६
सिरपूर कागजनगरएसकेझेडआर१४:१ ८१४:२०१३७११०:५४१०:५५३०६
बेलामपल्लीबीपीक्यू१४:५ ३१४:५५१४०९१०:२७१०:२ ८२६८
मंचेरिअलएमसीआय१५:१ ३१५:१५१४२९१०:०११०:०२२४८
रामगुंडमआरडीएम१५:२ ३१५:२५१४४३०९:४ ८०९:५०२३४
काझीपेठ जं.केझेडजे१६:४५१६:४७१५३५०८:४००८:४२१४२
सिकंदराबाद जं.एससी१९:१५१९:२०१६६७०६:४५०६:५०१०
हैद्राबाद डेक्कनएचवायबी१९:५०अंतिम थांबा१६७७मूळ स्थानक०६:२५

छायाचित्र

हे सुद्धा पहा

आंध्र प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेस

सिकंदराबाद न्यू दिल्ली दुरांतो एक्स्रपेस

सिकंदराबाद रेल्वे स्थानक

संदर्भ

  1. ^ "इलेक्ट्रिक लोकामोटिव्ह" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b "ए पी एक्सप्रेस – १२७२४" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ a b "ए पी एक्सप्रेस – १२७२३" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "आंध्र प्रदेश एक्सप्रेस" (इंग्लिश भाषेत). 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-04-02 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य संदर्भ