Jump to content

आंद्रे गोराक

आंद्रे गोराक

आंज्द्रे गोराक
जन्मफेब्रुवारी १५, इ.स. १९५१
निवासस्थानडॉर्टमुंड, जर्मनी
कार्यसंस्थाडॉर्ट्मुंड विद्यापिठ
लोड्ज तंत्रज्ञान विद्यापिठ

आंद्रे गोराक (पोलिश: Andrzej Górak ;) (फेब्रुवारी १५, इ.स. १९५१; आंद्रीचोव, पोलंड - हयात) हे एक पोलिश रसायन अभियंते आहेत. ते डॉर्टमुंड विद्यापीठातील जैवरसायन आणि रसायन अभियांत्रिकी विभागात पदार्थ पृथक्करण विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

व्यावसायिक जीवन

इ.स. १९६८ साली गोराकने लोड्ज तंत्रज्ञान विद्यापिठातून रसायनशास्त्राचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. इ.स. १९७३ साली त्यांनी रसायन अभियांत्रिकीची पदवी घेतली. इ.स. १९७९ साली रसायन अभियांत्रिकी विभागातून विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्याच विभागात वरिष्ठ अभियंता म्हणून काम केले. या कालावधीत त्यांनी 'मल्टीकॉंम्पोनंट डीस्टीलेशन' याविषयामधे संशोधन केले. इ.स. १९८८ मधे त्यांनी हेंकेल नावाच्या कंपनीमधे संशोधक म्हणून काम केले. इ.स. १९८९ साली आखेन विद्यापीठात निवासी संशोधक म्हणून काम केल्यावर इ.स. १९९२ साली ते डॉर्ट्मुंड विद्यापीठात पूर्ण वेळ प्राध्यापक म्हणून रुजू झाले. इ.स. १९९६ मधे त्यांनी एसेन विद्यापीठात पदार्थ पृथक्ककरण विभागाच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. ४ वर्षे एसेन मधे संशोधन केल्यानंतर इ.स. २००० साली ते डॉर्टमुंड विद्यापीठातील पदार्थ पृथक्करण विभागाच्या प्रमुखपदी परतले.

इ.स. १९९९ साली नॉर्वेतील ट्रॉन्डहाईम शहरात नॉर्वे विद्यापीठात आणि इ.स. २००० मधे पोलंडमधील लोड्ज विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापकपदाकरता आमंत्रित करण्यात आले होते मात्र त्यांनी डॉर्टमुंड विद्यापीठातच संशोधन करण्यास पसंती दिली.

संशोधन

रासायनिक आणि अरासायनिक डीस्टीलेशन

  • सर्व प्रकारच्या डिस्टिलेशनचा संगणकीय अभ्यास, डिस्टिलेशन उपकरण
  • प्रयोग आणि संगणकीय अभ्यास यांची तुलना
  • नवीन उपकरण व संबधीत सुट्या भागांचे संशोधन

मेंम्ब्रेन प्रक्रिया

  • संगणकीय संयुक्त मेंब्रेन आणि डीस्टीलेशन प्रक्रिया
  • मेंब्रेन प्रक्रिया संशोधन

रासायनिक निष्कर्षण

  • रासायनिक निष्कर्षणाचे संगणकीय संशोधन

स्टेफान-मॅक्सवेल आधारीत रासायनिक पृथ्थक्कीकरण प्रक्रियांचा संगणकीय अभ्यास व संशोधन

  • बहुपदार्थीय रासायनिक प्रक्रियांमधील उष्णता व पदार्थ वहन

पारितोषिके आणि गौरव

  • इ.स. १९७४: सर्वोत्तम व्यावसाभिमूख पदविका प्रबंध, पोलंड
  • इ.स. १९७९: सर्वोत्तम विद्यावाचस्पती (पी. एच. डी.) प्रबंध
  • इ.स. १९८३: पोलिश शास्र अकादमीच्या सचिवांतर्फे 'तंत्रद्यान हस्तांतरणा'करता विषेश पुरस्कार
  • इ.स. १९९२: आखेन विद्यापिठातील सर्वोत्तम व्यावसायिक प्रबंधाकरता 'फ्रिडरिश-विलहेल्म पारीतोषिक'
  • इ.स. २०१०: जर्मनी आणि पोलंड मधील आंतरराष्ट्रीय सामंजस्याकरता केलेल्या विषेश योगदानाकरता जर्मन प्रजासताकतर्फे 'ऑर्डर ऑफ मेरीट' पदक

प्रकाशित पुस्तके

ई.वाय. केनिग, ए. गोराक: मॉडेलिंग ऑफ रिॲक्टिव्ह डिस्टिलेशन. मॉडेलिंग ऑफ प्रोसेस इंटेन्सिफिकेशन. (सं. एफ.जे. केली), वायली-व्हीसीएच, वाइनहाइम, २००७

जे. रिश्टर, ए. गोराक': ई.वाय. केनिग: रिॲक्टिव्ह डिस्टिलेशन'. इंटिग्रेटेड रिॲक्शन अँड सेपरेशन ऑपरेशन्स. (सं. एच. श्मिट-ट्रॉब आणि ए. गोराक), स्प्रिंगर, हायडेलबर्ग, २००६

क. होलमान, ए. गोराक: ॲब्सॉर्प्शन.फ्लुइड व्हेर्फाह्रेनस्टेक्निक. ग्रुंडलागेन, मेथोडिक, टेक्निक, प्राक्सिस. (सं. आर. गोडेके), वायली-व्हीसीएच, वाइनहाइम, २००६

ई.वाय. केनिग, ए. गोराक: रिॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन. इंटिग्रेटेड केमिकल प्रोसेसेस . (सं. के.. सुंडमाकर, ए. काइनले आणि ए. सीडेल-मॉर्गेनस्टर्न), वायली-व्हीसीएच, वाइनहाइम, २००५

ई.वाय. केनिग, ए. गोराक, एच.जे.बार्ट: रिॲक्टिव्ह सेपरेशन इन फ्लुइड सिस्टम्स. रि-इंजिनीयरिंग द केमिकल प्रोसेस प्लांट. (सं. ए. स्टॅनकीविझ आणि जे. मूलीन), मार्सेल डेकर इंक., न्यू यॉर्क, २००३

ए. गोराक: सिम्युलेशन थर्मिशर ट्रेनेव्हेरफाह्रेन फ्लुइडर व्हियेलकोम्पोनेन्टेनगेमिश. प्रोझेस्सिम्युलेशन. (सं. एच. शुलर), व्हेर्लाग केमी, मानहाइम, १९९५

संशोधन प्रबंध आणि पेटंट्स

प्रा. गोराक यांच्या एकूण ३९० प्रबंध तसेच पेटंट्सच्या माहितीकरता खालील आंतरजालाच्या दुव्यावर टीचकी मारा.

संदर्भ