Jump to content

आंत्रपुच्छ

आंत्रपुच्छाचे स्थान दर्शवणारी पचनमार्गाची आकृती (मजकूर: इंग्लिश)
सुजलेले आंत्रपुच्छ् - शस्त्रक्रियेदरम्यान
सुजलेले आंत्रपुच्छ् - दुर्बिणीतुन शस्त्रक्रियेदरम्यान

शरीरशास्त्रानुसर आंत्रपुच्छ (इंग्लिश: Vermiform appendix, वर्मीफॉर्म अ‍ॅपेंडिक्स् ;) हा पृष्ठवंशी प्राण्यांमधील लहान आतडे आणि मोठे आतडे यांना जोडणाऱ्या अंधांत्राचाच शेपटीसारख्या टोकाचा भाग असतो. लहान आतडे आणि मोठे आतडे यांना जोडणाऱ्या अंधांत्रात असलेली झडप लहान आतड्यातून आलेल्या अन्नाला परत जाण्यापासून रोखते, याच झडपेला लागून हा भाग असतो. मानवाच्या शरीरात अंधांत्र अगदी लहान असते. अंधांत्र आणि आंत्रपुच्छ दोन्ही मानवाला उपयोगी नसतात. घोडा, गाय यांसारख्या तृण भक्षक प्राण्यांमध्ये अंधांत्र मोठे असते. कठीण, तंतुमय पदार्थांच्या पचनासाठी या प्राण्यांना त्याचा उपयोग होतो. या भागात मोठ्या संख्येने असलेले जीवाणू या पदार्थांचे पचन घडवून आणतात.

याला सूज आल्यावर त्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. त्याला अपेंडेक्टोमी असे म्हणतात.