आंतोन ब्रुकनर
आंतोन ब्रुकनर Anton Bruckner | |
---|---|
जन्म | सप्टेंबर ४, इ.स. १८२४ आन्सफेल्डन, ओबरओस्टराईश, ऑस्ट्रिया |
मृत्यू | ऑक्टोबर ११, इ.स. १८९६ (वयः ७१) व्हियेना |
संगीत प्रकार | सिंफनी |
आंतोन ब्रुकनर (जर्मन: Anton Bruckner; सप्टेंबर ४, इ.स. १८२४ - ऑक्टोबर ११, इ.स. १८९६) हा एक ऑस्ट्रियन संगीतकार होता. सिंफनी रचनांमध्ये त्याचे योगदान मौल्यवान मानले जाते. त्याच्या कारकीर्दीत ब्रुकनरला अनेक टीकाकारांनी निंदले होते परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या रचनांना प्रसिद्धी मिळाली. अॅडॉल्फ हिटलर हा ब्रुकनरच्या संगीताचा चाहता होता व नाझी जर्मनीच्या काळात ब्रुकनरचे संगीत मोठ्या प्रमाणावर प्रचारले गेले.
बाह्य दुवे
- ब्रुकनरचे व्यक्तीचित्र (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
- ब्रुकनर जरनल