आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना (इंग्लिश: International Air Transport Association; संक्षेप: आय.ए.टी.ए., IATA) ही कॅनडाच्या मॉंत्रियाल येथे स्थित असलेली एक आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना आहे. जगातील विमान उद्योगाचे प्रतिनिधित्व करणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. सध्या १२६ देशांमधील २४३ विमान कंपन्या ह्या संघटनेच्या सदस्य आहेत.
आय.ए.टी.ए. कोड
जगातील प्रत्येक वापरात असलेल्या विमानतळासाठी आय.ए.टी.ए.ने तीन अक्षरी संक्षेप ठरवले आहेत. उदा. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी BOM तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी DEL हा कोड वापरात आहे. अनेकदा ह्या संक्षेपांमध्ये शहराचे किंवा विमानतळाच्या नावाचा वापर केला जातो. उदा. लंडन-हीथ्रो LHR तर शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ ORD ह्या संक्षेपांनी ओळखले जातात. परंतु काही विमानतळांचे संक्षेप पूर्णपणे वेगळेच ठरवले गेले आहेत, उदा. वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ - IAD.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
आयएटीए संकेतस्थळ Archived 1999-11-28 at the Wayback Machine.