Jump to content

आंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण


आंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण (इंग्रजी: International Alphabet of Sanskrit Transliteration) एक लोकप्रिय लिप्यंतरण योजना आहे जी कि ब्राम्ही लिपी घराण्याचे क्षतिशून्य (लॉसलेस) रोमनकरणसाठी वापरली जाते. यात आस्की मध्ये नसलेल्या चिन्हांचे पण उपयोग होतात. या व्यतिरिक्त लॅटिन लिपीतल्या छोट्या आणि मोठ्या अक्षरांचा पण प्रयोग होतो.

लोकप्रियता

IAST संस्कृत आणि पाली भाषांच्या केरोमणीकरणासाठी सर्वाधिक लोकप्रिय लिप्यंतरण प्रणाली आहे. हे सहसा मुद्रित प्रकाशनात वापरले जाते, विशेषतः भारतीय धर्मांशी संबंधित प्राचीन संस्कृत आणि पाली विषयांवर पुस्तकांमध्ये. यूनिकोड फॉण्ट सुलभ झाल्याने या प्रणालीचा वापर इलेक्ट्रॉनिक मजकूरात पण होतो.

IAST 'इंटरनेशनल काँग्रेस ऑफओरिएंटॅलिस्ट्स' द्वारे १८८४ मध्ये जेनेवा मध्ये निश्चित केलेल्या मानकांवर आधारित आहे. [] ही प्रणाली देवनगरी आणि शारदा लिपीसारख्या भारतीय लिपींच्या इतर ब्राह्मी लिपी घराण्याचे क्षतिशून्य लिप्यंतरण प्रदान करते. या प्रणालीत संस्कृत मधले स्वनिमच नव्हे तर त्यांचे स्वनीय प्रतिलेखन देखील दिसून येतो.

कोलकाता राष्ट्रीय ग्रंथालय रोमनीकरण योजनेत, ब्राम्ही लिपिघराण्याच्या सर्व लिप्यांच्या रोमणीकरणाहेतू IAST चा विस्तार झाला.

IAST योजना सारणी

IAST मध्ये वापरले जाणारे चिन्ह असे आहेत

 
a  A
 
ā  Ā
 
i  I
 
ī  Ī
 
u  U
 
ū  Ū
 
ṛ  Ṛ
 
ṝ  Ṝ
 
ḷ  Ḷ
 
ḹ  Ḹ
स्वर


 
e  E
 
ai  Ai
 
o  O
 
au  Au
द्विस्वर
(diphthongs)


अं 
ṃ  Ṃ
अनुस्वार
अः 
ḥ  Ḥ
विसर्ग


कण्ठ्य तालव्य मूर्धन्यदन्त्य ओष्ठ्य
 
k  K
 
c  C
 
ṭ  Ṭ
 
t  T
 
p  P
अघोष
 
kh  Kh
 
ch  Ch
 
ṭh  Ṭh
 
th  Th
 
ph  Ph
अघोष प्राणस्फुट
 
g  G
 
j  J
 
ḍ  Ḍ
 
d  D
 
b  B
सघोष
 
gh  Gh
 
jh  Jh
 
ḍh  Ḍh
 
dh  Dh
 
bh  Bh
सघोष प्राणस्फुट
 
ṅ  Ṅ
 
ñ  Ñ
 
ṇ  Ṇ
 
n  N
 
m  M
नासिक
   
y  Y
 
r  R
 
l  L
 
v  V
अर्धस्वर
   
ś  Ś
 
ṣ  Ṣ
 
s  S
  सीत्कारयुक्त
 
h  H
        सघोष सीत्कारयुक्त

ISO 15919 सोबत तुलना

IAST लिप्यंतरण हे ISO 15919 चं एक उपसंच आहे. आयएसओ मानकांनी देवनागरी व इतर भारतीय लिपींमध्ये संस्कृत व्यतिरिक्त भाषांमध्ये शब्द लिहिण्यासाठी वापरल्या गेलेल्या काही अतिरिक्त प्रतीकांचा स्वीकार केला आहेअसल्यामुळे याला खालील पाच अपवाद आहेत :

देवनागरी IAST ISO 15919 टिप्पणी
ए/ ेe ē ISO e -- ए/ े साठी
ओ/ोo ō ISO o -- ओ/ो साठी
 ंISO -- गुरुमुखी 'टिप्पी'  ੰ साठी
ऋ/ ृISO -- ड़ साठी
ॠ/ ॄr̥̄ सोबत सुसांगतेसाठी

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  1. ^ History of Skt. transcription and 1894, Rapport de la Trans.