Jump to content

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (International Society for Krishna Consciousness or ISKCON) किंवा हरे कृष्ण चळवळ ही एक गौडिय वैष्णव संप्रदायाची धार्मिक संघटना आहे. भक्तिमार्ग हा सर्वात महत्त्वाचा असे ही संघटना मानते. ह्या संघटनेची स्थापना ए.सी.भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद ह्यांनी 1966साली न्यू यॉर्क शहरात केली. तिची तत्त्वे ही वैदिक ग्रंथ, मुख्यत्वे श्रीमदभागवतम् श्रीमद्भगवद्गीता आणि गौडिय वैष्णव परंपरेवर आधारित आहेत. गौडिय वैष्णव परंपरेचे १५व्या शतकापासून भारतीय अनुयायी आहेत तसेच २०व्या शतकापासून खूप अमेरिकन आणि युरोपिय भक्त आहेत.

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ
हरे कृष्ण मंदिर, वृंदावन, उत्तर प्रदेश, भारत.
स्थापना १३ जुलै १९६६ (५४ वर्षांपूर्वी)
संस्थापक ए.सी.भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद
प्रकार धार्मिक संघटना
उद्देश्य कृष्णभक्ती प्रसार
मुख्यालय श्री श्री राधामाधव पंचातत्त्व मंदिर (इस्कॉन मायापुर), मायापुर, पश्चिम बंगाल, भारत
स्थान
  • ८५० मंदिरे, आश्रम आणि सेंटर्स
सेवाकृत क्षेत्र जागतिक संघटना
महासचिव
Ramai swami
मुख्य अंग
गव्हर्निंग बॉडी कमिशन
सम्बन्धन गौडिय वैष्णव संप्रदाय
संकेतस्थळhttps://iskcon.org/

कृष्णभावनामृत संघाची स्थापना भक्ती योगाचा प्रसार करण्यासाठी झाली होती. आज कृष्णभावनामृत संघाचे जागतिक स्तरावर जवळपास 10 लाखांच्या आसपास भक्तमंडळी आहे. त्यामानाने पाश्चिमात्य देशांत कमी भक्तसंख्या असूनही हरे कृष्ण चळवळीस प्रभावी मानले जाते. हेन्री फोर्ड यांचे नातु आणि फोर्ड मोटर्सचे मालक अल्फ्रेड फोर्ड हे सुद्धा कृष्णभावनामृत संघाचे भाग आहेत. त्यांनी अंबरिश दास हे नाव घेतले आहे. ते कृष्ण भक्त आहेत.

कृष्ण व्हॅली येथील कृष्ण मंदिर मेलबर्न
वैदिक पद्धतीने बांधलेले इको हाऊस यात कमीत कमी ताण निसर्गावर येतो - कृष्ण व्हॅली मेलबर्न जवळ

इतिहास व श्रद्धा

Pancha-Tattva deities: Chaitanya Mahaprabhu, Nityananda, Advaita Acharya, Gadadhara and Srivasa, installed in a Gaudiya Vaishnava temple
ISKCON's Bhajan during Navratri Golu at Coimbatore, Tamil Nadu, India

कृष्णभावनामृतसंघाचे भक्त गौडिय भागवत वैष्णव भक्त परंपरेला मानतात आणि ते गौडिय वैष्णव पंथाचे खूप मोठे भाग आहेत. वैष्णव ह्या शब्दाचा अर्थ होतो 'जो विष्णुची भक्ती करतो तो', आणि जिथे ही वैष्णव परंपरा उदयास आली त्या पश्चिम बंगाल राज्यातील गौड प्रांतासंदर्भाने गौड हा शब्द येतो. मागील पाचशे वर्षांत गौडिय वैष्णव परंपरेचे भारतात, विशेषतः पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये भक्तगण राहिलेले आहेत. संपूर्ण बंगालभर आपले आनंदमयी भक्ती विचार पसरलेल्या श्री चैतन्य महाप्रभुंनी गौडीय वैष्णव परंपरेची स्थापना केली. श्री चैतन्य महाप्रभुंनी संकीर्तन आंदोलनाची स्थापना केली. जाती संप्रदायाच्या नाही ह्या सांघिक भक्तिमार्गाने कठोर जातिव्यवस्थेेला प्रतिक्रिया दिली. चैतन्य महाप्रभुंनी हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यावर भर दिला. गौडिय वैष्णव त्यांना स्वतः श्रीकृष्णाचा अवतार मानतात. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद चैतन्य महाप्रभुंची गौडिय वैष्णव परंपरा पाश्चिमात्य देशांत १९६५साली घेऊन गेले. वयवर्ष ६५ असताना ते न्यू यॉर्क शहरात पोहोचले. न्यू यॉर्कमध्ये त्यांनी सार्वजनिक उद्यानामध्ये जप आणि प्रसार करण्यास सुरुवात केली आणि तरुण आणि हिप्पी लोकांना आकर्षित करू लागले. त्यांची चळवळ "हरे कृष्ण चळवळ" म्हणून ओळखली जाऊ लागली. हरे कृष्ण चळवळ तर आणखीनच मोठी झाली जेव्हा त्यांनी वर्षभराने सन फ्रान्सिस्को येथे स्थानांतर केले. जेव्हा ही चळवळ इंग्लंडला आली तेव्हा तिला बीटल्सच्या जॉर्ज हॅरिसनकडून लोकप्रियता आणि आर्थिक पाठबळ मिळाले. त्याने भरपूर गाणी कृष्णभावनामृत भक्तांसोबत रेकॉर्ड केली. त्याच्या "My sweet lord" ह्या प्रख्यात गाण्यात त्याने हरे कृष्ण महामंत्राचा समावेश केला.

नियम

हेच व्यावहारिक पालन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघचे काही मूलभूत नियम आहेत. कोणत्याही प्रकारची नशा नाही. (चहा, कॉफी नाही) अवैध स्त्री / पुरुष गमन नाही मांसहार भक्षण नाही. (कांदा, लसु नाही) जुआ नाही (शेअर बाजारही नाही) त्यांना तामसिक अन्न नाही (तामसिक अन्न म्हणून त्यांना ,कांदा लसुन, मांस, मदिरा इत्यादिपासून दूर राहा) अनैतिक वर्तणुकीपासून दूर राहा एक तास शास्त्रीय अभ्यास (यात गीता आणि भारतीय धर्म-इतिहास संबंधित शास्त्रांचा अभ्यास करणे) 'हरे कृष्णा-हरे कृष्णा' नावाची १६ वेळा माळा जपा. शुद्ध शाकाहार.hamja BG akk

प्रमुख तत्त्वे

  • मांसाहार वर्ज्य
  • जुगार वर्ज्य
  • सर्व प्रकारची नशा वर्ज्य
  • व्याभीचार वर्ज्य

कार्य

जगात हिंदू धर्माचे महत्त्व आणि आध्यात्मिक जीवनातील आनंद समजावण्याचे काम हरेकृष्ण संप्रदाय करत असतो. या धर्मप्रसाराची सुरुवात म्हणून कृष्णभक्ती आणि तत्त्वज्ञान समजावून दिले जाते. याद्वारे जास्तीत जास्त लोक याकडे आकर्षित होतील असे पाहिले जाते. त्यासाठी शहरातून भक्तिमार्ग दर्शवणाऱ्या भजनांच्या फेऱ्या काढल्या जातात. या मिशनने अनेक ठिकाणी खाद्यपदार्थाच्या सोई करून दिल्या आहेत. त्यासाठी फूड फॉर लाइफ ही वेगळी उपशाखा निर्माण करण्यात आली आहे. भारताबाहेर सुमारे शंभराहून अधिक देशांमध्ये या संस्थेने हिंदुधर्म प्रसाराचे महत्त्वाचे काम सुरू ठेवलेले आहे. आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थितीत राहणाऱ्या ११ लाख विद्यार्थ्यांना व मुलांना भारतात इस्कॉन फूड रिलीफ फाउंडेशन द्वारे दुपारचे जेवण देण्यात येत आहे. हे सर्व कार्य स्वयंसेवकांद्वारे विनामूल्य केले जाते.

मेलबर्न येथील भारतीय वेशात सहजतेने वावरणारे स्वयंसेवक

जगातल्या काही प्रमुख संगीतकारांना हरेकृष्ण संप्रदाय आकर्षक वाटला आहे. जसे बीटल्स, जॉन लेनन, इ.

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ मंदिरे

चित्रदालन

हे सुद्धा पहा