Jump to content

आंतरराज्य परिषद

ही एक भारतातील परिषद आहे.या परिषदेची स्थापना जनता दल सरकारने व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली २८ मे १९९० रोजी तत्कालीन राष्ट्रपतींच्या अधिसूचनेनुसार झाली.केंद्र - राज्य संबंधावरील सरकारीया आयोगाने कलम २६३ अंतर्गत ही परिषद स्थापन करण्याची शिफारस केली होती.

कार्य

ही परिषद राज्याराज्यांतील तसेच केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यादरम्यानच्या मुद्यांबाबत सल्लागार मंडळ म्हणून कार्य करते.ही परिषद केंद्र किंवा राज्य यांमधील सामायिक हितसंबंधांच्या विषयांबाबत अन्वेषण आणि चर्चा करते.