Jump to content

अहिल्यानगरी एक्सप्रेस

अहिल्यानगरी एक्सप्रेस किंवा अहिल्या एक्सप्रेस ही भारतीय रेल्वे ची मेल/एक्सप्रेस गाडी मध्यप्रदेशच्या इंदूर पासून केरळची राजधानी त्रिवेंद्रम पर्यंत धावणारी गाडी आहे. ही गाडी आठवड्यातून एकदा धावते.[]

संख्या आणि परिभाषा

गाटी क्रमांक तपशील
16325 इंदूर जंक्शन ते त्रिवेंद्रम सेंट्रल
16326 त्रिवेंद्रम सेंट्रल ते इंदूर जंक्शन

नाव

या गाडीला इंदूर संस्थानच्या राणी अहिल्याबाई होळकर यांचे नाव दिले गेले आहे. इंदूर शहराचे नाव पूर्वी नाव अहिल्यानगरी होते.[]

वेळापत्रक

ट्रेन क्रं. प्रस्थान वेळ प्रस्थान स्टेशन आगमन स्टेशन वार
16325 4:40 पी.एम. इंदूर जंक्शन त्रिवेंद्रम सेंट्रल सोमवार
16326 5:00 ए.एम. त्रिवेंद्रम सेंट्रल इंदूर जंक्शन सोमवार

ट्रेन मार्ग आणि थांबे

ही ट्रेन खालील मार्गाने धावते : इंदूर जंक्शन, देवास जंक्शन,उज्जैन जंक्शन,शूजलापूर,भोपाल जंक्शन,भोपाल हबिबगंज,होसांगाबाद,इटारशी जंक्शन,घोर डोंगरी, अमला जंक्शन,बैतुल,नागपूर,चंद्रपूर,बललरशाह,वरंगळ,खम्माम,विजयवाडा जंक्शन,चेन्नई सेंट्रल,अरक्कोनाम जंक्शन, कटपडी,सेलम जंक्शन, एरोड जंक्शन,कोइंबतूर जंक्शन,पालक्कड जंक्शन,थृस्सुए रेल्वे स्थानक,एरणाकुलम जंक्शन,अलाप्पूझा,कोललं जंक्शन त्रिवेंद्रम सेंट्रल.[]

बोगी व्यवस्था

या ट्रेन ला सामान्यतः 23 बोगी असतात. त्यात

  • 2 द्वितीयश्रेणी वातानुकूलित ( टू टायर )
  • 2 तृतीय श्रेणी वातानुकूलित ( थ्रि टायर )
  • 1 भोजन व्यवस्था
  • 14 श्ययन यान
  • 4 सामान्य

सरासरी वेग आणि आवक जावक काळं

या ट्रेनचा तासी 55 किमी सरासरी वेग आहे आणि दोन्ही ठिकाणाहून ती साप्ताहिक पद्धतीने धावते.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "इंदूर रेल्वे स्थानक ला 20 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर".
  2. ^ "अहिल्यानगरी एक्सप्रेस सेवा". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-01-08 रोजी पाहिले.
  3. ^ "अहिल्यानगरी एक्सप्रेस (22645) अनुसूची / रूट".
  4. ^ "१६३२५ अहिल्यानगरी एक्ष्प्रेस्स वेळापत्रक". 2016-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-01-08 रोजी पाहिले.