Jump to content

अहिरावण

अहिरावण हा रावणाचा लहान भाऊ आणि पातालपुरीचा राजा होता. मेघनादच्या मृत्यूनंतर रावणाने अहिरावणास राम आणि लक्ष्मण दोघांना पातालपुरीत घेऊन जाऊन त्यांना ठार मारण्यास सांगितले. रावणाच्या आज्ञेचे पालन करून अहिरावणने श्री राम आणि लक्ष्मण दोघांना निद्रिस्त असताना पळवून नेले. जेव्हा विभीषण ला कळले की हे अहिरावण चे काम आहे तेव्हा हनुमानाने श्रीराम आणि लक्ष्मण दोघांना सोडवून आणण्याचा निश्चय केला. अहिरावण ने आपल्या मित्रांशी सल्लामसलत केली आणि त्याने देवी महामायाला दोन दैवी भावांचे प्राण अर्पण करण्याचा निर्णय घेतला. तथापि, हनुमानाने अहिरावणाचा शिरच्छेद करून, आणि त्याच्या सैन्याचा नाश करून त्यांचे प्राण वाचवले.