Jump to content

अहमदिया

अहमदिया (Ahmadiyya) हा एक इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपसंप्रदाय आहे. हनफी इस्लामिक कायद्याचं पालन करणाऱ्या समुदायाला ‘अहमदिया’ म्हटलं जातं. जगभरात सुमारे १ कोटी अहमदिया मुसलमान आहेत. या समुदायाची स्थापना भारतातल्या पंजाबमधल्या कादियानमध्ये मिर्झा गुलाम अहमद यांनी केली होती. मिर्झा गुलाम अहमद, नबी यांचाच अवतार असल्याचं या समुदायाच्या अनुयायांचे म्हणणे आहे. मिर्झा यांनी नवा शरियतचा कायदा मांडला नाही. मुहम्मद पैगंबरांनी सांगितलेल्या शरियतचंच हा समुदाय पालन करतो.

पैगंबरांनंतर जगभरात अल्लानं दूत पाठवण्याची परंपरा बंद झाली यावर मुसलमानांच्या बहुतांशी संप्रदायांमध्ये एकमत आहे. पण, अहमदिया समुदायाच्या म्हणण्यानुसार मिर्झा यांना नबीचा दर्जा प्राप्त आहे. या मुद्यावरून मुसलमानांमध्ये तीव्र मतभेद आहेत. मुसलमानांमधील एक मोठा वर्ग अहमदिया समुदायाला मुसलमान मानतच नाही. पण, तरीही भारत, पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये या समुदायाच्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पाकिस्तानात अधिकृतपणे अहमदिया समुदायाला इस्लाममधून वगळण्यात आलं आहे.

हे सुद्धा पहा