Jump to content

अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालय आणि संशोधन केंद्र

अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालय मे १९६० मध्ये स्थापन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील या संग्रहालयामध्ये सूक्ष्म पेंटिंग, शिल्पे, शस्त्रं, पगडी आणि हस्तलिखित इत्यादिंचा एक अनोखा संग्रह आहे. गणेश मूर्तीचा विशेष विभाग आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे मूळ रंगविलेल चित्र, चीजर्मनी साखळी नसलेली सायकल, तांत्रिक गणपती, संस्कृत – मराठी शब्दकोश, २०० फूट लांबीच्या कुंडली ही या संग्रहालयाची काही आकर्षणे आहेत.