Jump to content

अस्तेक दिनदर्शिका

ऍझ्टेक दिनदर्शिका

ऍझ्टेक दिनदर्शिका ही ऍझ्टेक आणि मध्य मेक्सिकोमधील प्री-कोलंबियन संस्कृतीतील जमाती दिनदर्शिका म्हणून वापरीत. प्राचीन मेसोअमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या काही मेसोअमेरिकन दिनदर्शिकांपैकी ही एक आहे.

ह्या दिनदर्शिकेत ज्याला क्स्युपोवाली ("वर्ष मोजणी") म्हणत असे ३६५ दिवसांचे दिनदर्शिका चक्र आणि ज्यास टोनाल्पोवाली ("दिवस मोजणी") म्हणत असे २६० दिवसांचे धार्मिक चक्र अशी दोन चक्रे असत. ही दोन्ही चक्रे एकाच वेळी सुरू असतात. ३६५ दिवसांच्या ५२ वर्षांनंतर येणाऱ्या दिवसाला शतकाचा किंवा दिनदर्शिका चक्राचा पहिला दिवस म्हणत.

टोनाल्पोवाली

२६० दिवसांच्या चक्रासाठी टोनाल्पोवाली ("दिवस मोजणी") ही संज्ञा आहे. प्रत्येक दिवसाची तारीख एक ते तेरा यांपैकी एक आकडा आणि दिवसांच्या २० चिन्हांपैकी एक असे दोन घटक मिळून दर्शवितात. दर दिवशी आकडा एकने वाढतो आणि पुढचे चिन्ह येते. 'एक मगर', त्यानंतर 'दोन वारा', 'तीन घर', 'चार सरडा', असे होत होत शेवटी 'तेरा वेत' ही तारीख येते. तेराव्या वेत या चिन्हानंतरचे चौदावे चिन्ह बिबट्या. म्हणून पुढची तारीख 'एक बिबट्या'. पुढची 'दोन गरुड' आणि शेवटची विसावी 'सात पुष्प'. चिन्हे संपली. त्यामुळे त्यानंतर पुढचा आकडा आणि पहिल्या चिन्हापासून म्हणजे 'आठ मगर" पासून पुढे चक्र सुरू राहते आणि पुढेपुढे जात रहाते. २० चिन्हे आणि १३ आकडे ह्यांच्या चक्राचे पूर्ण २६० दिवस (१३×२०) झाले की पुन्हा 'एक मगर' पासून सुरुवात होते.

दिवस चिन्हे

इतर मेसोअमेरिकन दिनदर्शिका, मुख्यत्वे मिक्सटेक्सांकडून वापरली जाणारी चिन्हे आणि ऍझ्टेक दिवस चिन्हांत दाखवलेले प्राणी किंवा वस्तू यांत बरेच साम्य आहे.

दिवस चिन्हांची चित्रे काही अझ्टेक ग्रंथात दिली आहेत, तर काही मोठ्या दगडांवर कोरलेली आहेत. कोडेक्स मॅग्लियाबेचियानो वरून घेतलेली काही चिन्हे अशी:

Imageनाहुआट्ल नावउच्चार (IPA)मराठी भाषांतरदिशेचे अधिपत्य
सिपाक्टली[siˈpaktɬi]मगर
ऍलिगॅटर (Alligator)
कैमान (Caiman)
मगरसदृश राक्षसी प्राणी
पूर्व
एहेकाट्ल[eʔˈeːkatɬ]वाराउत्तर
काली[ˈkalli]घरपश्चिम
केट्झपालीन[kʷetsˈpalin]सरडादक्षिण
कोआट्ल[ˈkoː(w)aːtɬ]सापपूर्व
मिकिझ्टली[miˈkistɬi]मृत्यूउत्तर
माझाट्ल[ˈmasaːtɬ]मृगपश्चिम
टोच्टली[ˈtoːtʃtɬi]ससादक्षिण
ऍट्ल[aːtɬ]जलपूर्व
इट्झकिंट्ली[itsˈkʷintɬi]श्वानNorth
ओझोमाट्ली
ओझोमाहट्ली
[osoˈmaʔtɬi]मर्कटपश्चिम
Imageनाहुआट्ल नावउच्चार (IPA)मराठी भाषांतरदिशेचे अधिपत्य
मालिनाली[maliːˈnalli]गवतदक्षिण
अकाट्ल[ˈaːkatɬ]वेतपूर्व
ओसेलोट्ल[oˈseːloːtɬ]बिबट्याउत्तर
क्वाहट्ली
कुऔहट्ली
[ˈkʷaːwtɬi]गरूडपश्चिम
कोझ्काक्वाहट्ली
कोझ्काकुऔहट्ली
[koːsaˈkʷaːwtɬi]गिधाडदक्षिण
ओलिन[ˈoliːn]हालचाल
कंप
भूकंप
पूर्व
टेक्पाट्ल[ˈtekpatɬ]गारगोटी
गारगोटीची सुरी
उत्तर
क्याहुइट्ल[kiˈ(j)awitɬ]पर्जन्यपश्चिम
क्सोच्टिट्ल
क्षोच्टिट्ल
[ʃoːtʃitɬ]पुष्पदक्षिण

एहेकाट्ल आणि ट्लालोक ह्या देव अनुक्रमे वारा आणि पाऊस ह्यांच्याची संबंधित असल्याने वारा आणि पाऊस ह्यांना त्यांची चिन्हे दिली आहेत.

त्रेचेना

१३ अंकांच्या दिवसांच्या संचास त्रेचेना ही स्पॅनिश संज्ञा वापरली जाते (त्रेचे = "तेरा"). २६०-दिवस चक्रातील प्रत्येक २० त्रेचेना कुठल्यातरी देवदेवतांशी संबंधित असे.

त्रेचेनादेव
१ मगर – १३ वेतओमेटेओट्लl
१ जाग्वार – १३ मृत्यूक्वेटझालकोआट्ल
१ मृग – १३ पर्जन्यटेपेयोलोट्ल
१ पुष्प – १३ गवतह्युह्युकोयोट्ल
१ वेत – १३ सर्पचल्च्युहट्लीक्यु
१ मृत्यू – १३ वेतटोनाट्युह
१ पर्जन्य – १३ मर्कटट्लालोक
१ गवत – १३ सरडामायाह्युल
१ सर्प – १३ कंपन (कंप)क्स्युहटेक्युहट्ली
१ वेत – १३ श्वानमिक्टलानटेक्युहट्ली
त्रेचेनादेव
१ मर्कट – १३ घरपाटेकाट्ल
१ सरडा – १३ गिधाडइट्झट्लाकोल्युक्वी
१ कंपन – १३ जलट्लाझोल्टेओट्ल
१ श्वान – १३ वाराक्सिपे टोटेक
१ घर – १३ गरूडइट्झ्पापालोट्ल
१ गिधाड – १३ ससाक्सोलोट्ल
१ जल – १३ मगरचाल्च्युहटोटोलीन
१ वारा – १३ बिबट्याचांटिको
१ गरूड – १३ मृगक्सोचिक्वेट्झाल
१ ससा – १३ पुष्पक्स्युहटेक्युहट्ली

हे सुद्धा पहा

  • माया दिनदर्शिका

बाह्य दुवे