Jump to content

असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स

असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (इंग्लिश: Association of Tennis Professionals; व्यावसायिक टेनिसपटूंची संघटना, संक्षेपः एटीपी) ही व्यावसायिक पुरूष टेनिसपटूंसाठी १९७२ साली स्थापन करण्यात आलेली एक क्रीडा संघटना आहे. १९९० सालापासून एटीपी जगातील सर्व व्यावसायिक पुरुष टेनिस स्पर्धांचे आयोजन करते व पुरुष खेळाडूंची क्रमवारी कार्यरत ठेवते. टेनिस जगतामधील चार मानाच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा, ९ ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १००० स्पर्धा तसेच वर्षाखेरीस खेळवली जाणारी ए.टी.पी. वर्ल्ड टूर फायनल्स ह्या स्पर्धांचे आयोजन ए.टी.पी.द्वारे केले जाते.

विमेन्स टेनिस असोसिएशन ही संस्था महिला टेनिसपटूंसाठी स्थापन झाली असून तिचे कार्य बव्हंशी ए.टी.पी. समान चालते.

एकेरी क्रमवारी

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "ATP Rankings (singles)". ATP.