असंगत नाट्य
असंगत नाट्य किंवा न-नाट्य म्हणजे इंग्रजीत ’द थिएटर ऑफ अॅबसर्ड्स’. हा नाटकांमधला एक विशिष्ट प्रकार आहे. या नाट्यप्रकाराला मराठीच्या संदर्भात व्यस्ततावादी रंगभूमी असे नाव, रा.ग.जाधव यांनी दिले आहे. विनाशाकडे चाललेल्या जगात माणसाच्या नियतीवर नियंत्रण ठेवू पाहण्याचा व्यर्थ प्रयत्न करणाऱ्या मानवतेचे व्यस्त दर्शन अशा नाटकांतून होते. जो माणूस आपल्या धार्मिक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक मुळापासून उखडलेला आहे अशी माणसाची कथा या असंगत नाटकातून सादर केली जाते. अशी नाटके लिहिणाऱ्या नाटककारांनी जगाचे जे वेगळे दर्शन घेतले, त्याची त्यांनी रंगमंचभाषा निर्माण केली आणि ते निरर्थ-निरालंब अनुभव नाटकरूपाने सादर केले.
असंगत नाट्यासाठी झालेला भाषेचा विचार, हा मुळातच माणसामाणसांमधील संवाद नाहीसा झाला असताना, वरवरचे औपचारिक संवाद चालू ठेवण्याच्या तिटकाऱ्यातून मिर्माण झालेला असतो. प्रेमातील कूट प्रश्न, मैत्रीचे मायाजाल, माणसाच्या विषण्णतेतून बाहेर पडणारे प्रेमकारण आणि माणसाच्या एकाकीपणाचे कवच न भेदू शकणारे प्रेम आणि मैत्री, अशा अनेक सूत्रांवर ही नाटके आधारलेली असतात. नाटकांतून जेथे संवाद साधत नाही, तेथे तो चालू ठेवण्याचा उठवळ यत्न म्हणजे लाकडी सामानाशी संवाद केल्यासारखे आहे, हे या नाटकांतून दर्शवले जाते.
असंगत नाटक शून्यतेवर भाष्य करते. असंगत नाटय हे केवळ मनोरंजन आणि व्यवसायाचे माध्यम नाही तर ते आत्मसंतुष्टताआहे. एव्हढेच नव्हे तर आत्म-चेतना देखील आहे. रंगमंच आणि नाटक हे दृष्टी आणि वचनबद्धतेचे माध्यम आहे. हे नाट्य आपल्याला नेहमीच गतिमान बनवते आणि समाजाच्या हितासाठी ऊर्जावान बनवते. काळाच्या पुढे पहायचे शिकवते. महान नाटककार यूजीन आयनेस्को आणि त्याच्या गेंडा नाटक काळसंगत वाटते. ते गेंडे शहरात फिरत आहेत.ज्या जवळच्या लोकांच्या संपर्कात येताच तेसुद्धा त्यांच्यासारखे बनतात आणि त्या गटात सामील होतात. हे समूह एक वेगवान वेगाने वाढतात. संसर्गाची गती वेगाने वाढते. अशीच काही दृश्य गेंडा नाटकात आहेत. येथे गेंडा एक प्रतिक आहे, जी मनुष्यापासून प्राण्यापर्यंतच्या समाजाचे वास्तव अधोरेखित करते.गेंडा ही मनुष्याच्या संवेदनशीलता गमावण्याची व्याख्या आहे. या नाटकात समाज गेंडामध्ये रूपांतरित झाला आहे. या नाटकाचे मुख्य पात्र बेरंजे आहे, डेझी त्याची जोडी आहे. दोघेही या गेंडाबरोबर शेवटपर्यंत संघर्ष करत असतात. बेरंजे डेझीला सांगतात, आपण गेंडा बनण्यापासून स्वतःस रोखले पाहिजे. त्यानंतर आपण नवनिर्मिती करू शकतो. एक नवीन समाज बनवू शकतो. परंतु अखेरीस डेझी देखील गेंडा बनते आणि वाढते. दबाव, प्रभाव, मोह या घटनेत तो कळपांचा भाग बनतो. शेवटचा माणूस एकटाच जगतो, असहाय्य बेरंजे, तो हताश आहे परंतु निराश नाही. शेवटपर्यंत लढा देण्याचा त्याचा निर्धार आहे. संपूर्ण परिस्थिती उलट आहे, आशेचा किरण दिसत नाही. नवीन पिढीच्या सर्व शक्यता संपल्या आहेत. अशा परिस्थितीतही या नाटकाचा नायक बेरेन्जे गडगडाट बोलतो, "हो, मी एकमेव आहे आणि शेवटचा माणूस बाकी आहे. मी हार मानणार नाही. मी माघार घेणार नाही. मी शेवटपर्यंत लढा देईन, मी लढा देईन." हो, हो मी जिवंत माणूस आहे. मी कधीही शस्त्र सोडणार नाही. मी लढा देईन शेवटच्या क्षणापर्यंत .....! हे नाटककारांचे नाटक आणि वचनबद्धता आहे. खरेतर समीक्षक मार्टिन थिएटर ऑफ अॅबसर्डचा विचारवंत या नाटकाला अॅबसर्ड थिएटरचे एक उत्तम नाटक मानतात, तर अनेक विद्वानांनी अॅडसर्डिटीला नैराश्याचे प्रतिबिंब म्हणले आहे. बरीच अॅबसर्ड नाटक मानवी जीवनाची नाटकं आहेत. .मानसिक विघटनाची जाणीव झाल्यास असे नाटय घडते.
असंगत नाट्ये लिहिणारे पाश्चात्त्य नाटककार
- अॅन नेलिको
- अझॅन योनेस्को
- आंतोन आर्तो
- आपॉलिनेर
- आर्थर आदामॉव्ह
- एडवर्ड आल्बी
- एन.एफ. सिम्पसन
- झां झने
- सॅम्युएल बेकेट
- हॅरॉल्ड पिंटरे
अझॅन योनेस्को
असंगत नाटय विश्वातील महत्त्वपुर्ण नाटककार म्हणजे अझॅन योनेस्को.अझॅन योनेस्को आणि त्यांचे गेंडा नाटक कालसंगत वाटते. त्यांच्या नाटकातील ते गेंडे शहरात फिरत आहेत.ते जवळच्या लोकांच्या संपर्कात येताच तेसुद्धा त्यांच्यासारखे बनतात आणि त्या गटात सामील होतात अर्थात गेंडेच होतात. ही एक वृत्ती आहे.हे समूह वेगाने वाढतात. त्यांच्या संसर्गाची गती वेगाने वाढते. अशीच काही दृश्य गेंडा नाटकात आहेत. येथे गेंडा एक प्रतिक आहे, जे मनुष्यापासून प्राण्यापर्यंतच्या समाजाचे वास्तव अधोरेखित करते.गेंडा ही मनुष्याच्या संवेदनशीलता गमावण्याची व्याख्या आहे. या नाटकात समाज गेंडा या प्राण्यात रूपांतरित झाला आहे. या नाटकाचे मुख्य पात्र बेरंजे आहे, डेझी त्याची जोडी आहे. दोघेही या गेंडाबरोबर शेवटपर्यंत संघर्ष करत असतात. बेरंजे डेझीला सांगतात, आपण गेंडा बनण्यापासून स्वतःस रोखले पाहिजे. त्यानंतर आपण नवनिर्मिती करू शकतो. एक नवीन समाज बनवू शकतो. परंतु अखेरीस डेझी देखील गेंडा बनते आणि वाढते. दबाव, प्रभाव, मोह या घटनेत तो कळपांचा भाग बनतो. शेवटी माणूस एकटाच जगतो, असहाय्य बेरंजे, तो हताश आहे परंतु निराश नाही. शेवटपर्यंत लढा देण्याचा त्याचा निर्धार आहे. संपूर्ण परिस्थिती उलट आहे, आशेचा किरण दिसत नाही. नवीन पिढीच्या सर्व शक्यता संपल्या आहेत. अशा परिस्थितीतही या नाटकाचा नायक बेरेन्जे प्रचंड आत्मविश्वासाने बोलतो, "हो, मी एकमेव आहे आणि शेवटचा माणूस बाकी आहे. मी हार मानणार नाही. मी माघार घेणार नाही. मी शेवटपर्यंत लढा देईन, मी लढा देईन." हो, हो मी जिवंत माणूस आहे. मी कधीही शस्त्र सोडणार नाही. मी लढा देईन शेवटच्या क्षणापर्यंत .....! समीक्षक मार्टिन थिएटर ऑफ अॅबसर्डचा विचारवंत या नाटकाला अॅबसर्ड थिएटरचे एक उत्तम उदाहरण असणारे नाटक मानतात. तर अनेक विद्वानांनी अॅबसर्डिटीला नैराश्याचे प्रतिबिंब म्हणले आहे. बरीच अॅबसर्ड नाटकं मानवी जीवनाची नाटकं आहेत.मानसिक विघटनाची जाणीव झाल्यास असे नाटय घडते.
पाश्चात्त्य नाटककारांकडून स्फूर्ती घेऊन मराठीत असंगत नाट्ये लिहिणारे नाटककार
- अच्युत वझे
- चंद्रकांत देशपांडे
- प्रशांत दळवी
- रघू दंडवते
- शफाअत खान
- सतीश आळेकर
मराठीतील असंगत नाट्ये
- खुर्च्या
- चल रे भोपळ्या टुणुक टुणुक
- दगड का माती
- बेगम बर्वे
- महानिर्वाण
- साय-साखर, वगैरे.
[[महानिर्वाण]]
भारतीय रंगभूमीवरील प्रख्यात नाटककार-दिग्दर्शक सतीश आळेकर यांचं ‘महानिर्वाण’ हे १९७४ साली आलेलं कृष्णसुखात्मिका (Black Comedy) स्वरूपाचं नाटक. या नाटकाचे ५०० हून जास्त प्रयोग झाले आहेत. याचा अर्थ वर्षांला सरासरी दहा प्रयोग! म्हणजे फार नाहीत. मराठी रंगभूमीवर काही नाटकांचे हजारोंनी प्रयोग होऊनही इतिहासानं त्यांची घेतलेली नाही. ‘महानिर्वाण’ मात्र यास अपवाद ठरलं. ते भारतीय रंगभूमीवरील मैलाचा एक दगड ठरलंय. महानिर्वाण नाटकाने आपलं वेगळपण जपलआहे.