अष्टावक्र
अष्टावक्र हे हिंदू धर्मातील एक ऋषि होते.
नावाची व्युत्पत्ती
अष्ट म्हणजे आठ, आणि वक्र म्हणजे वाकडा अर्थात ज्याचे शरीर आठ ठिकाणी वाकडे झालेले आहे, तो अष्टावक्र होय.
अष्टावक्रचा जन्म
ऋषि उद्दालक यांचा कहोड नावाचा प्रसिद्ध शिष्य होता. उद्दालक ऋषींची कन्या सुजाता हिचा कहोडशी विवाह झाला. सुजाता ही गर्भवती असताना एक दिवस कहोड हे वेदपाठ करत होते. तेव्हा सुजाताच्या गर्भातील पुत्र कहोड यांना म्हणाला,"पिताश्री, तुम्ही जे हे रात्रभर वेदपाठ करत आहात, ते ठीक नाही आहे." तेव्हा काहीद यांना राग आला. आणि त्यांनी त्या पुत्राला शाप दिला, की तू गर्भात असतानाच असे वाकडे बोलतोस, म्हणून तू आठ ठिकाणी वाकडा होशील.म्हणून त्या पुत्राचे शरीर आठ ठीकाणी वाकडे झाले, म्हणून त्याला अष्टावक्र असे नाव मिळाले.
अष्टावक्र गीता
अष्टावक्र यांनी अष्टावक्र गीता (अष्टावक्र संहिता) हा ग्रंथ लिहिला. मिथिला नरेश राजर्षी जनक व अष्टावक्र यांच्यातील संवाद, असे या गीतेचे स्वरूप आहे. वेदान्ताविषयीचा प्रकरण ग्रंथ म्हणून ही गीता प्रसिद्ध आहे. २० प्रकरणे आणि २९९ श्लोकांची ही गीता आहे. अद्वैत वेदान्तावरील ‘विवेकचूडामणि’ हा ग्रंथ व शंकराचार्याची अनेक स्तोत्रे यांमध्येही अष्टावक्र गीतेतील काही संकल्पनांचे स्पष्टीकरण आढळते.
अष्टावक्रगीतेचा पहिला भाग पुढीलप्रमाणे आहे-
||श्री ||
अथ श्रीमदष्टावक्रगीता प्रारभ्यते || जनक उवाच || कथं ज्ञानमवाप्नोति कथं मुक्तिर्भविष्यति | वैराग्यं च कथं प्राप्तं एतद् ब्रूहि मम प्रभो ||१- १|| अष्टावक्र उवाच || मुक्तिं इच्छसि चेत्तात विषयान् विषवत्त्यज | क्षमार्जवदयातोषसत्यं पीयूषवद् भज ||१- २|| न पृथ्वी न जलं नाग्निर्न वायुर्द्यौर्न वा भवान् | एषां साक्षिणमात्मानं चिद्रूपं विद्धि मुक्तये ||१- ३|| यदि देहं पृथक् कृत्य चिति विश्राम्य तिष्ठसि | अधुनैव सुखी शान्तो बन्धमुक्तो भविष्यसि ||१- ४|| न त्वं विप्रादिको वर्णो नाश्रमी नाक्षगोचरः | असङ्गोऽसि निराकारो विश्वसाक्षी सुखी भव ||१- ५|| धर्माधर्मौ सुखं दुःखं मानसानि न ते विभो | न कर्तासि न भोक्तासि मुक्त एवासि सर्वदा ||१- ६|| एको द्रष्टासि सर्वस्य मुक्तप्रायोऽसि सर्वदा | अयमेव ही ते बन्धो द्रष्टारं पश्यसीतरम् ||१- ७|| अहं कर्तेत्यहंमानमहाकृष्णाहिदंशितः | नाहं कर्तेति विश्वासामृतं पीत्वा सुखी भव ||१- ८|| एको विशुद्धबोधोऽहं इति निश्चयवह्निना | प्रज्वाल्याज्ञानगहनं वीतशोकः सुखी भव ||१- ९|| यत्र विश्वमिदं भाति कल्पितं रज्जुसर्पवत् | आनन्दपरमानन्दः स बोधस्त्वं सुखं भव ||१- १०|| मुक्ताभिमानी मुक्तो ही बद्धो बद्धाभिमान्यपि | किंवदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ||१- ११|| आत्मा साक्षी विभुः पूर्ण एको मुक्तश्चिदक्रियः | असंगो निःस्पृहः शान्तो भ्रमात्संसारवानिव ||१- १२|| कूटस्थं बोधमद्वैतमात्मानं परिभावय | आभासोऽहं भ्रमं मुक्त्वा भावं बाह्यमथान्तरम् ||१- १३|| देहाभिमानपाशेन चिरं बद्धोऽसि पुत्रक | बोधोऽहं ज्ञानखंगेन तःनिकृत्य सुखी भव ||१- १४|| निःसंगो निष्क्रियोऽसि त्वं स्वप्रकाशो निरंजनः | अयमेव ही ते बन्धः समाधिमनुतिष्ठति ||१- १५|| त्वया व्याप्तमिदं विश्वं त्वयि प्रोतं यथार्थतः | शुद्धबुद्धस्वरूपस्त्वं मा गमः क्षुद्रचित्तताम् ||१- १६|| निरपेक्षो निर्विकारो निर्भरः शीतलाशयः | अगाधबुद्धिरक्षुब्धो भव चिन्मात्रवासनः ||१- १७|| साकारमनृतं विद्धि निराकारं तु निश्चलम् | एतत्तत्त्वोपदेशेन न पुनर्भवसंभवः ||१- १८|| यथैवादर्शमध्यस्थे रूपेऽन्तः परितस्तु सः | तथैवाऽस्मिन् शरीरेऽन्तः परितः परमेश्वरः ||१- १९|| एकं सर्वगतं व्योम बहिरन्तर्यथा घटे | नित्यं निरन्तरं ब्रह्म सर्वभूतगणे तथा ||१- २०||
अधिक माहिती
- अष्टावक्र - महागीता - लेखिका चारुशीला भिडे (राजश्री प्रकाशन)
- अष्टावक्र गीता - शं. बा. मठ (अरविंद प्रकाशन, पृष्ठे- ११२, मूल्य- १२० रु.)
- अष्टावक्र संहिता - लेखक नारायण पाटणकर, केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, पृष्ठे - २३४
बाह्य दुवे
- संपूर्ण संस्कृत गीत दुवा
- हिंदी अनुवाद Archived 2011-12-29 at the Wayback Machine.
- अष्टावक्र कथा Archived 2016-03-04 at the Wayback Machine.