Jump to content

अष्टांगहृदय

अष्टांगहृदय हा आयुर्वेदाचा एक संहिताग्रंथ असून बृहद्त्रयींपैकी, अर्थात तीन मोठ्या ग्रंथांपैकी, एक आहे. आचार्य वाग्भट हे या संहितेचे लेखक आहेत. बृहद्त्रयींतले बाकीचे दोन ग्रंथ म्हणजे चरक संहितासुश्रुत संहिता.

अष्टांगहृदय या ग्रंथात औषधोपचार आणि शस्त्रक्रिया हे दोन्ही विषयांचा समावेश आहे.

महर्षी वाग्भट यांनी आपल्या जीवन काळात आयुर्वेदावर एकूण दोन ग्रंथ लिहिले. . त्यातील पहिला ग्रंथ अष्टांगसंग्रह आणि दुसरा 'अष्टांग ह्रदयम्'. पहिल्या ग्रंथातील उणीवा दूर करून मग काही वर्षांनी सुधारित ज्ञानाची भर घालून त्यांनी दुसरा ग्रंथ लिहिला, असे ते स्वतःच आपल्या दुसऱ्या ग्रंथात लिहितात. या दुसऱ्या ग्रंथात म्हणजे 'अष्टांग ह्रदयम्' मध्ये एकूण ७५०० सूत्रे असून ही सूत्र एकूण सहा विभागांत वाटली गेली आहेत. ते विभाग पुढील प्रमाणे आहेत.

१) सूत्रस्थानम्। (३० अध्याय)
२) शारीरस्थान। (६ अध्याय)
३) निदानस्थान। (१६ अध्याय)
४) चिकित्सास्थान। (२२ अध्याय)
५) कल्पस्थान। (६ अध्याय)
६) उत्तरस्थान।। (४० अध्याय)
इति वाग्भट संहिता ।