Jump to content

अश्विनी भिडे-देशपांडे

अश्विनी भिडे-देशपांडे

अश्विनी भिडे-देशपांडे
आयुष्य
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव मुंबई
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आईमाणिक भिडे
संगीत साधना
गुरू माणिक भिडे
गायन प्रकार गायन
घराणे जयपूर-अत्रौली
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
बाह्य दुवे
संकेतस्थळ
बोरगीत (भक्तिगीत): आलू मोई की कोहोबू दुखो
राग : भतीयाली
रचना: माधवदेव, आसाम
गायक: अश्विनी भिडे-देशपांडे

अश्विनी भिडे-देशपांडे ( ७ ऑक्टोबर १९६०) या लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका आहेत. त्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका आहेत. त्यांच्या गायकीवर मेवाती तसेच पतियाळा घराण्यांचा प्रभावसुद्धा आहे.

पूर्वायुष्य

शास्त्रीय गायिका माणिक भिडे आणि गोविंद भिडे हे अश्विनी भिडे यांचे आई-वडील. मुंबईमध्ये संगीताची परंपरा असलेल्या घराण्यात जन्मलेल्या भिडे यांचे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण पंडित नारायणराव दातार यांच्याकडे झाले. त्यांनी गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ ही पदवी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी घेतली.[] तेव्हापासून त्या आपली आई  माणिक भिडे यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम घेत आहेत. त्यांनी २००९ पर्यंत रत्नाकर पै यांच्याकडूनसुद्धा मागर्दर्शन घेतले. भिडे-देशपांडे यांनी सूक्ष्मजीवशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून जैवरसायनशास्त्रात पीएच.डी. मिळवली आहे. डॉक्टरेट मिळवेपर्यंत भिडे-देशपांडे यांनी संगीतातील व्यावसायिक कारकीर्दीचा विचार केलेला नव्हता.  

सांगीतिक कारकीर्द

जयपूर-अत्रौली, मेवाती आणि पतियाळा या घराण्याच्या प्रभावातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र गायनाची शैली तयार केली आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा हे उपशास्त्रीय गायन प्रकारसुद्धा त्या गातात. त्यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी अनेक स्तोत्रे, स्तुती यांचे गायन केले आहे.

बंदिश आणि बंदिश रचना या विषयांचे भिडे-देशपांडे यांना सखोल ज्ञान आहे. त्यांनी स्वतः अनेक बंदिशी रचल्या आहेत. या रचना राग रचनांजली ( २००४) या पुस्तकामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. २०१० मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या पुढच्या भागात राग रचनांजली २ मध्ये आणखी ९८ बंदिशी आहेत.

भिडे-देशपांडे यांनी जगभरातील अनेक संगीत संमेलनांमध्ये आणि मैफिलींमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यामध्ये पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, भुवनेश्वर, ओरिसा येथील राजा राणी महोत्सव, पुण्यातील गान सरस्वती महोत्सव यांचा समावेश आहे. त्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या टॉप ग्रेड गायिका आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम आणि आकाशवाणीच्या संगीत संमेलनामध्ये सहभाग घेतला आहे.

त्या अनेक शिष्यांना आपल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचे शिक्षण देत आहेत तसेच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्या अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये शास्त्रीय संगीतावर व्याख्याने - प्रात्याक्षिके देतात.

भारतीय शास्त्रीय संगीतातील मूर्च्छना पद्धतीवर आधारित जसरंगी जुगलबंदी म्हणजे एकाच वेळी स्त्री आणि पुरुष गायकाने दोन वेगवेगळे राग सादर करण्याची पद्धत. अश्विनी भिडे- देशपांडे यांनी संजीव अभ्यंकर यांच्याबरोबर अनेकवेळा जसरंगी जुगलबंदीचे सादरीकरण केले आहे.[][]

संगीत ध्वनिमुद्रिका

  • इंट्रोड्युसिंग अश्विनी भिडे (एचएमव्ही; १९८५) – राग यमन, राग तिलक कामोद, भजन  
  • रीदम हाऊस क्लासिक्स (रीदम हाऊस ; १९८७) – राग पूरिया धनाश्री, राग भूप, भजन  
  • अश्विनी भिडे सिंग्ज (एचएमव्ही; १९८८) – राग केदार, राग खंबावती, राग भूप नट
  • लाईव्ह फॉर फेमिना (रिदम हाऊस; १९८९) – राग नंद, राग बागेश्री
  • मॉर्निंग रागाज व्हॉ. १ (रिदम हाऊस; १९९०) – राग ललित, राग बिभास
  • मॉर्निंग रागाज व्हॉ. २ (रिदम हाऊस; १९९०) – राग तोडी, राग कबीर भैरव, राग सुखिया बिलावल
  • भक्तीमाला: गणेश व्हॉ. २ (म्युझिक टुडे; १९९१)- “जेही सुमिरत सिद्धी होय”, “जय श्री शंकर सूत गणेश”, “जय गणेश गणनाथ”, “गणपत विघ्न हरणा”
  • यंग मास्टर्स ( म्युझिक टुडे; १९९२) – राग भीमपलास, राग शुद्ध कल्याण
  • राग रंग भाग १ (अलूरकर; १९९६) – राग बिहाग, राग भिन्न षड्ज, भजन
  • राग रंग भाग २ (अलूरकर; १९९६) – राग मधुवंती, राग झिंजोटी, राग जोग, राग नायकी कानडा
  • पंढरपुरीचा निळा ( सागरीका; १९९८) – अभंग
  • वुमेन थ्रू एजेस (नवरस रेकॉर्ड्स; १९९८) – राग अहीर भैरव, राग जौनपुरी, भजन
  • कृष्ण ( निनाद म्युझिक; १९९९) – राग जयजयवंती, राग वाचस्पती, राग मेघ मल्हार, झुला, भजन
  • अश्विनी भिडे- देशपांडे – व्होकल (२००३) – राग बागेश्री, राग केदार, भजन
  • रूप पाहता लोचनी (२००४) – अभंग
  • कारी बदरीया (२००५) – राग अभोगी आणि प्रतीक्षा, झुला, दादरा
  • आनंदाचा कंद (मेघ म्युझिक; २०००) – अभंग

पुस्तके

  • राग रचनांजली (राजहंस प्रकाशन २००४) - स्वरचित बंदिशींचे पुस्तक आणि सीडी[]
  • राग रचनांजली - भाग २ (राजहंस प्रकाशन २०१०) - स्वरचित बंदिशींचे पुस्तक आणि सीडी
  • मादाम क्युरी (ग्रंथाली प्रकाशन २०१५) - इव्ह क्युरी यांनी लिहीलेल्या मेरी क्युरी यांच्या चरित्राचा मराठी अनुवाद[]

पुरस्कार व सन्मान

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ a b "Dr. Ashwini Bhide Deshpande Profile". ashwinibhide.in. 2020-01-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-07 रोजी पाहिले.
  2. ^ "जसरंगी जुगलबंदी में पेश किए एक ही गायन में अलग-अलग राग". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2020-01-10 रोजी पाहिले.
  3. ^ "भीमसेन जोशी महोत्सव शनिवारी सांगलीत". सकाळ. 2020-01-10 रोजी पाहिले.
  4. ^ "स्लाइड गिटार, गायनाने रसिक मंत्रमुग्ध". महाराष्ट्र टाइम्स. 2020-01-07 रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ Bhide-Deshpande, Ashwini Tran / भिडे-देशपांडे (2015). Madame Curie: मादाम क्युरी: a biography. Mumbai: Granthali Prakashan. ISBN 978-93-84475-57-4.
  6. ^ Sinha, Manjari (2018-11-17). "Ashwini Bhide Deshpande: Nurturing the covalent bonds of music". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2020-01-10 रोजी पाहिले.
  7. ^ "अश्विनी भिडे यांना 'वत्सलाबाई जोशी' पुरस्कार | eSakal". www.esakal.com. 2020-01-07 रोजी पाहिले.