Jump to content

अश्विनी आशिष देशपांडे

अश्विनी आशिष देशपांडे
AswiniDeshpande
जन्म १/१०/१९८६
राष्ट्रीयत्व भारतीय
जोडीदार आशिष देशपांडे


अश्विनी आशिष देशपांडे या मराठी गायिका आहेत. त्या संगीत विषयात विशारद असून औरंगाबाद आकाशवाणी केंद्राद्वारे त्यांच्या प्रकट मुलाखतीचे कार्यक्रम प्रसारित करण्यात आले आहेत. कविता लेखनासोबतच त्यांनी काव्य वाचनाचे कार्यक्रम सादर केले आहेत.

चरित्र

बालपण, शिक्षण आणि सुरुवातीचा काळ

अश्र्विनी आशिष देशपांडे यांचा जन्म १/१०/१९८६ साली अकोल्याला झाला. त्यांचे वडील श्री अरविंद देशपांडे हे महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ येथे कार्यरत होते. औरंगाबाद येथे त्यांची उच्च पदासाठी त्याच कार्यालयात नियुक्ती करण्यात आली. अश्र्विनी यांचा जन्म अकोल्याला जरी झाला असला तरी याकारणी त्यांचे बालपण औरंगाबाद येथेच व्यतित झाले. औरंगाबाद येथेच त्यांचे अनुक्रमे पहिली, दुसरी सौ. सुशीलाबाई देशमुख या शाळेत शिक्षण झाले. हे चालू असतांनाच त्यांनी पं. विजय देशमुख हे आत्त्याचे यजमान तसेच वडील श्री.अरविंद देशपांडे शीघ्र कवी आणि आई सौ.सुधा अरविंद देशपांडे उत्तम गायक असे घरीच संगीतमय वातावरण असल्याने घरातच सांस्कृतिक वातावरण आणि म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे इयत्ता दुसरी पासून त्यांना प्रा. दिलीप दोडके यांच्याकडे संगीताचे बाळकडू मिळाले आणि तिथून सुरू झाले संगीत पर्व. तिसरी चौथी महर्षी विद्यालय आणि उर्वरीत पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण संत मीरा या शाळेत झाले.

माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी संगीत हा विषय घेता यावा यासाठी कला शाखा निवडली आणि महाविद्यालय होते. शिवछत्रपती महाविद्यालय सुट्टीतला काळ वाया न जाऊ देता त्यांनी कम्प्यूटरचा डिप्लोमा कोर्स देखील अरिहंत इन्फोसिस औरंगाबाद येथे केला, तद्नंतर पदवी शिक्षणासाठी डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक हे महाविद्यालय त्यांनी निवडले. तिथे त्यांना अनेक दिग्गज गुरूंच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिकावयास मिळाले.

तद्नंतर एम. ए इंग्रजी वसंतराव नाईक महाविद्यालय येथे करून, संत गाडगे महाराज अध्यापक महाविद्यालय येथे बी. एड् ही पदवी पण त्यांनी पूर्ण केली.

संगीत शिक्षण आणि गुरू

डॉ.श्री दिलीप दोडके, पं.श्री पराग चौधरी, सौ. सुरेखा रत्नपारखी, आरती पाटणकर, सौ. अनुजा पाठक, श्रीमती उषा अग्निहोत्री जोशी उर्वरित शिक्षण पं. विजय देशमुख ह्यांच्याकडे चालू आहे.

संगीत विद्यालय

संगीत विद्यालय-- सांगीतिक साधना चालू असतांनाच अश्र्विनी आशिष देशपांडे यांनी ज्ञानार्जनाबरोबरच आपण घेत असलेल्या ज्ञानाचा फायदा इतरांनाही व्हावा यासाठी २००२ साली श्री दत्तमाई संगीत विद्यालयाची स्थापना केली. तसेच २०१४ साली स्वतः च्या स्वराशिष कला मंचाची स्थापना केली.

लग्न आणि अपत्ये

दिनांक ७/१२/२०१२ रोजी कु.अश्र्विनी अरविंद देशपांडे या श्री आशिष देशपांडे यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी एका कन्यारत्न ला जन्म दिला....नाव-आरोही देशपांडे

सन्मान, पुरस्कार, सहभाग, मानद सदस्य

नॅक कमिटी सदस्य : डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालय

१) मिलींद विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भीमगीत गायन स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले

२) २००३ साली घेण्यात आलेल्या रोटरी युवक महोत्सवामध्ये अंताक्षरी स्पर्धेत प्रथम पारितोषिक

३) २००६ साली आदर्श मित्र मंडळातर्फे घेण्यात आलेल्या सुगम गीत गायन स्पर्धेत उत्तेजनार्थ

पारितोषिक

४)२००७ साली घेण्यात आलेल्या युवक महोत्सवात त्यांच्या वडीलांनी रचलेल्या व सौ. अश्र्विनी यांनी संगीतबद्ध केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पोवाडा गाऊन द्वितीय पारितोषिक पटकावले तसेच लोकगीत आणि नाटकाचे अंग असल्याने यात आमचा काय गुन्हा या एकांकिकेत उत्कृष्ट खलनायिका म्हणून तृतीय पारितोषिक, सकाळ करंडकासाठी आमच आपल सर्वधर्म समभाव या एकांकिकेसाठी उत्कृष्ट दिग्दर्शन म्हणून सन्मान

५) अद्वैत महिला मंडळ तर्फे वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या देशभक्तीपर समूह गीतात स्वराशिष ग्रुप ला द्वितीय पारितोषिक

६) डॉ. सौ. इंं.भा.पा महाविद्यालयात लोककला या शिबीर प्रमुख म्हणून महाविद्यालयातर्फे सत्कार

७) स्वराशिष ग्रुप च्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नगरसेविका सौ. अर्चना नीळकंठ तर्फे सत्कार

८) अष्टविनायक मंदिर औरंगाबाद येथे विश्र्वस्त मंडळाकडून उत्कृष्ट गायनाबद्दल सत्कार

९) ज्येष्ठांसाठी गाण्याचे च नव्हे तर अनेक कार्यक्रम करण्याचा दरवर्षी नवीन उपक्रम

१०) धर्मवीर संभाजी शाळा येथे खुद्द श्री सुनील चिंचोलकर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाडा रचनेसाठी सत्कार

११) पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे परीक्षक म्हणून सहभाग

१२) धर्मवीर संभाजी शाळा येथे परीक्षक म्हणून सन्मान व सहभाग

१३) ८ मार्च २०१८ साली महिला दिनाच्या औचित्य सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे पोलिस आयुक्तासमोर सत्कार

१४) ८ मार्च २०१९ साली स्वराशिष ग्रुप चा अश्र्विनी देशपांडे निर्मित अद्भूत ६४ कलांचा मूर्त अमूर्त स्वरूपात दिमाखदार कार्यक्रम व भाजप महिला अध्यक्षा सौ. स्मिता दंडवते यांच्या हस्ते

उत्कृष्ट महिला म्हणून सत्कार

१५) जागर ग्रुप, स्वरामृत तसेच अनेक कार्यक्रमात उत्कृष्ट निवेदिका,हार्मोनियम वादक म्हणून  सहभाग आणि सन्मान

१६) समता दर्शन संस्थेतर्फे उत्कृष्ट गायनासाठी सत्कार व सन्मान

१७) राजकारणी तसेच सुप्रीम कोर्ट, हाईकोर्ट चीफ जस्टिस समक्ष मोठे कार्यक्रम सहभाग

१८) सुर नवा ध्यास नवा तसेच सध्या डी. डी सह्याद्री वाहिनीवर येऊ घातलेल्या आगामी महाराष्ट्र कला रत्न शो चे को- ऑर्डिनेटर म्हणून काम

१९) इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून मोठा सहभाग

२०) ओंकार भजनी मंडळ यात हार्मोनियम वादक म्हणून सन्मान

¶ डॉ. सौ. इं. भा. पा महाविद्यालयात NAAC Body committee कार्यरत

¶आकाशवाणी कलाकार -- काव्यवाचन, मुलाखत, भाषण मौलाना अबुल कलाम आझाद तसेच गायन कार्यक्रम

¶ Celeb & gossip या ऑनलाईन Magzine साठी लेखन, काव्य, कथा आदि.

¶ छंद -- गायन, वादन, नृत्य, चित्रकला, लेखन