अश्वशक्ती
एक अश्वशक्ती (हॉर्स पॉवर) म्हणजे १ मिनिटात ३३,००० पाउंड वजन १ फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती.
१८ व्या शतकाच्या शेवटी जेम्स वॅट (१७ जानेवारी १७३६ ते २५ ऑगस्ट १८१९) या स्कॉटिश संशोधकाने शोधलेल्या वाफेच्या इंजिनांचा वापर इंग्लंडमध्ये खाणीत अंतर्गत मालवाहतुकीसाठी सुरू झाला. अशा इंजिनाची क्षमता किती आहे, हे मोजण्यासाठी त्याने ‘अश्वशक्ती’ हे एकक विकसित केले.
पाळीव घोड्याच्या शक्तीचा वापर शेकडो वर्षे शेती, प्रवास, मालवाहतूक अशा बाबतीत होत होता; त्यामुळे कार्यशक्ती किंवा कामाचा वेग मोजण्यासाठी घोड्याच्या शक्तीशी तुलना करणे हे तर्कसंगत ठरले.
वॅटने निरीक्षण केले की एक घोडा १२ फूट (३.७ मी.) त्रिज्या असलेले गोल चाक एका मिनिटात २.४ वेळा फिरवतो, म्हणजे घोडा एका मिनिटात २.४ x २π x १२ फूट अंतर पार करतो, आणि त्यावरून घोडा १८० पाउंड्स-बल (८०० न्यूटन) या शक्तीने वजन ओढू शकतो. यावरून त्याने प्रतिमिनिट ३३,००० फूट-पाउंड्स असे कार्य करणे म्हणजे एक अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) असे प्रतिपादित केले. अर्थातच घोड्याची जात आणि वय या घटकांमुळे त्यात फरक पडू शकतो, आणि घोडा सर्वकाळ याच शक्तीने कार्य करू शकत नाही, हे उघड आहे. त्याचप्रमाणे यंत्राची आदर्श, निर्धारित आणि प्रत्यक्षात वापरली जाणारी अश्वशक्ती, अशी वेगवेगळी असते. अश्वशक्ती हे एकक पिस्टनयुक्त इंजिन, बॉयलर, विद्युत मोटर, पाणचक्की (टर्बाइन) अशा यंत्रांपासून प्राप्त होणाऱ्या शक्तीच्या मोजमापासाठी उपयोगात येते.
यासंदर्भातील अन्य एकके
एक यांत्रिकी अश्वशक्ती =५५० फूट-पाउंड्स/सेकंद = ७४५.६९९८७ वॅट्स
एक मेट्रिक अश्वशक्ती = ७३५.४९६७५ वॅट्स (७५ किलोग्रॅम वजन एका सेकंदात एक मीटर ओढणे)
एक विद्युत अश्वशक्ती = ७४६ वॅट्स
१,००० वॅट्स = १ किलोवॅट = १.३४ अश्वशक्ती
KVA (किलोवॉल्ट-एम्पीयर) आणि अश्वशक्ती हे दोन विविध व्यासगत अक्षरशक्तीचे मोजमाप आहेत. KVA असलेली अपॅरंट शक्तीचा एक युनिट आहे, तर HP म्हणजे मेकॅनिकल शक्तीचा एक युनिट आहे. KVA आणि अश्वशक्ती दरम्यान रूपांतरण प्रणालीच्या दक्षतेशी अवलंबून आहे, ज्यामध्ये थेट संशोधनांचा वेगळ्या कारकांवर असू शकतो. पण, काही सामान्य सूत्रे असतील जे KVA आणि अश्वशक्ती दरम्यान रूपांतरण संचालित करण्यास मदत करू शकतात: 1. एसी मोटर्ससाठी: अश्वशक्ती = (KVA x पावर फॅक्टर x कार्यक्षमता) / 0.746 KVA = (HP x 0.746) / (पावर फॅक्टर x कार्यक्षमता) या सूत्रामध्ये, पावर फॅक्टर हा रियल पावर ते अपॅरंट पावरच्या अनुपाताचे असतो, आणि दक्षता मोटरची दक्षता असते.
2. ट्रान्सफॉर्मरसाठी: KVA = अश्वशक्ती x 1.341 अश्वशक्ती = KVA / 1.341 या सूत्रामध्ये, 1.341 चा रूपांतरण करण्याचा कारक ट्रान्सफॉर्मरच्या 75-80% दक्षतेवर आधारित आहे.