अशोक सुंंदरी
अशोक सुंदरी | |
देवी अशोक सुंदरी चे एक काल्पनिक चित्र | |
वडील | भगवान शिव |
आई | पार्वती |
पती | नहुष |
अपत्ये | ययाति आणि १०० मुली |
भावंडे | गणपती आणि कार्तिकेय |
नामोल्लेख | पद्मपुराण |
अशोक सुंदरी (संस्कृत: अशोकसुन्दरी, Aśokasundarī) ही एक हिंदू देवी/देवकन्या आहे. ही भगवान शिव आणि माता पार्वती यांची कन्या आहे, असे मानले जाते. देवी अशोक सुंदरी चे वर्णन पद्मपुराणात येते.
एका आख्यायिके नुसार, पार्वती मातेचा एकटेपणा घालवण्यासाठी कल्पवृक्षा पासून हिची निर्मिती झाली. अर्थात शिव आणि पार्वती यांच्या मिलनातून हीच जन्म नाही झाला. अ+शोक अर्थात सुख, माता पार्वतीला सुखी म्हणजे प्रसन्न करण्यासाठी हिची निर्मिती झाली आणि ही देवी दिसण्यास अत्यंत सुंदर आणि विलोभनीय असल्यामुळे सुंदरी हा तिच्या नावातील दुसरा शब्द येतो.[१]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "भगवान शिव और पार्वती की पुत्री 'अशोक सुंदरी' के बारे में ये बात नहीं जानते होंगे आप" (हिंदी भाषेत). १८ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.