अशोक पाध्ये
अशोक पाध्ये (इ.स. १९३८ - इ.स. २०१५) हे एक मराठी विज्ञानलेखक होते. विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना, नवे संशोधन, नवीन प्रवाह यांबाबत सुलभ भाषेत लेखन त्यांनी मराठीत विज्ञानलेखन केले.
अशोक पाध्ये हे भूशास्त्राचे स्नातक होते. ते अनेक औद्योगिक संस्थांमध्ये कामाला होते. ते ग्लायडर वैमानिक होते. त्यांना काचेबद्दलची तांत्रिकी, विमानविद्या आणि सिनेमॅटोग्राफीची माहिती होती. त्यांना रशियन भाषा अवगत होती. अनेक खासगी महाविद्यालयांत त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.
पाध्ये पुणे विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान वाटिकेचे संचालक होते.
अशोक पाध्ये यांचे लेखन
विविध वृत्तपत्रे आणि मासिकांतून त्यांचे विज्ञान विषयावरील संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. 'डीएनएचे गोल गोल जिने' हे त्यांचे पुस्तक डीएनएची संकल्पना आणि त्याचे विज्ञान साध्या भाषेत उलगडणारे आहे. महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कारही या पुस्तकाला मिळाला.
अनुवादित पुस्तके
इंग्रजीतील उत्तमोत्तम साहित्याचा सरस अनुवाद अशोक पाध्ये यांनी केला. जॉर्ज ऑरवेल यांच्यापासून ते डॅन ब्राऊन यांच्यापर्यंतच्या अनेक लेखकांच्या इंग्रजी साहित्याचा त्यांनी अनुवाद केला.
एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे भाषांतरही त्यांनी केले. याशिवाय त्यांनी टाटा कंपनीतील अधिकारी आर.एन. लाला यांच्या तसेच माजी संरक्षणमंत्री जसवंतसिंह यांनी लिहिलेल्या जिना - हिंदुस्थान फाळणी आणि कंदाहार विमान अपहरण प्रकरणी लिहिलेल्या ग्रंथांचा अनुवाद आणि भारतीय शास्त्रज्ञांच्या पहिल्या अंटार्क्टिका मोहिमेचा वृत्तान्त लिहिला होता.
अशोक पाध्ये यांची काही मराठी पुस्तके
- अल्टिमेट बिझनेस मास्टरी (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जस्टीन सॅच)
- ए कॉल टू ऑनर (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जसवंत सिंग)
- १९८४ (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जॉर्ज ऑरवेल)
- एंजल्स ॲन्ड डेमन्स (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डॅन ब्राऊन)
- द गन्स ऑफ नॅव्हारन अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - अॅलिस्टर मॅक्लीन)
- द गोल्डन गेट (अनुवादित. मूळ इंग्रजी लेखक - अॅलिस्टर मॅक्लीन)
- द गोल्डन रॉन्देव्हू (अनुवादित. मूळ इंग्रजी लेखक - अॅलिस्टर मॅक्लीन)
- जिना : हिंदुस्थान - फाळणी - स्वातंत्र्य (अनुवादित, मूळ लेखक - जसवंत सिंग)
- द डार्क क्रुसेडर (अनुवादित. मूळ लेखक - अॅलिस्टर मॅक्लीन)
- डिजिटल फॉर्ट्रेस (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डॅन ब्राऊन)
- डिसेप्शन पॉईंट (मूळ इंग्रजी लेखक - डॅन ब्राउन)
- डी.एन.ए.चे गोलगोल जिने
- डोंगरी ते दुबई (अनुवादित मूळ इंग्रजी लेखक - एस. हुसेन झैदी). या पुस्तकाचा दुसरा भाग - भायखळा ते बँकॉक - अनुवादक उज्ज्वला बर्वे)
- नो गॉड इन साइट (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - अल्ताफ टायरवाला)
- परिवर्तनाचा जाहीरनामा (अनुवादित, मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज, लेखक ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि व्ही. पोतराज)
- पुणे ते पंतप्रधानांचे कार्यालय (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - बी.जी. देशमुख)
- प्रूफ ऑफ हेवन (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डॉ. एबन ॲलेक्झांडर)
- फिअर इज द की (अनुवादित. मूळ इंग्रजी लेखक - अॅलिस्टर मॅक्लीन)
- द ब्रोकर (अनुवादित. मूळ इंग्रजी लेखक -जाॅन ग्रिशॅम)
- मनिचेंजर्स (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ऑर्थर हेली)
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गमावलेली वर्षे (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - संजीव केळकर)
- द लायन्स गेम (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - नेल्सन डेमिल)
- द लॉस सिंबॉल (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डॅन ब्राऊन)
- द लास्ट फ्रंटियर (अनुवादित. मूळ इंग्रजी लेखक - अॅलिस्टर मॅक्लीन)
- द सटन बग (अनुवादित. मूळ इंग्रजी लेखक - अॅलिस्टर मॅक्लीन)
- साऊथ बाय जावा हेड (अनुवादित. मूळ इंग्रजी लेखक - अॅलिस्टर मॅक्लीन)
- सिंधची दर्दभरी कहाणी (अनुवादित, मूळ इंग्रजी खक - के. आर. मलकानी)
- सीविच (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - अॅलिस्टर मॅक्लीन)
- हॉटेल (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ऑर्थर हेली)