अशोक ढवण
डॉ. अशोक श्रीरंगराव ढवण (७ मे, १९५७:उजनी-अौसा, महाराष्ट्र) हे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. ३१ मे २०१८ रोजी त्यांची या पदावर नेमणूक झाली.
शिक्षण
- १९७८ साली परभणी कृुषी विद्यापीठातून प्रथमश्रेणीत कृषी पदवी
- १९८० साली दिल्लीच्या इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूटमधून एम.एस्सी (कृषी)
- १९८४ साली दिल्ली येथेच मृद् विज्ञान या विषयात पीएच.डी.
कारकीर्द
पीएच.डी.नंतर ढवण यांची मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृद् विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी निवड झाली. हे काम करीत असतानाच ते लातूर व उस्मानाबाद येथील कृषी महाविद्यालयांचे डीन होते.[१]
ढवण हे अमेरिकेतील ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी यांचे फेलो होते. ओरेगन विद्यापीठ व वॉशिंग्टनमधील विविध विद्यापीठे व संशोधन संस्थांमध्ये संशोधनात्मक काम करण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान या प्रकल्पाचे ते विद्यापीठातील मुख्य अधिकारी होते.
२०१३ व २०१४ या काळात अशोक ढवण हे कृषी दैनंदिनी मासिकाचे तसेच ‘शेती-भाती’ या मासिकाचे मुख्य संपादक होते.