अशोक चौसाळकर
डाॅ. अशोक एस. चौसाळकर हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे इ.स.. १९७९ ते २०१० या काळात राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक व काही वर्षे विभागप्रमुख होते.. 'समाजप्रबोधन पत्रिका' या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. डॉ. अशोक चौसाळकर हे मुळचे मराठवाड्यातील अंबाजोगाई येथील होत.
अशोक चौसाळकरांनी लिहिलेली पुस्तके
- आगरकर विचार (सहलेखक - तानाजी ठोंबरे, डाॅ. भा.ल. भोळे)
- आगरकरांचे राजकीय विचार (२००५)
- आधुनिक भारतीय राजकीय विचार : प्रवाह आणि अंतःप्रवाह
- आधुनिक राजकीय सिद्धान्त (स्पर्धा परीक्षेसाठीचे पुस्तक)
- कोल्हापुरातील सामाजिक व राजकीय चळवळी (सहलेखक - रणधीर शिंदे)
- कॉ. गोविंद पानसरे - समग्र वाड्मय (२ खंड)
- संस्कृतिभाष्यकार डी. डी. कोसंबी
- धर्म, समाज आणि राजकारण (संपादित, कोल्हापुरात श्रमिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील आठ व्याख्याने)
- नवरात्र (२०००)
- धर्म आणि न्याय (२००५)
- शहीद भगतसिंग - जीवन व कार्य (२००७)
- प्राचीन भारतीय राजकीय विचार
- महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ
- मार्क्सवाद - उत्तर मार्क्सवाद (२०१०)
- टिळक आगरकरांचे राजकीय विचार (संपा.)(२००८)
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे धर्मविषयक विचार
- कॉ. श्रीपाद अमृत डांगे
टिळक आगरकर यांचे राजकीय विचार मराठी पुस्तकं पाहिजे
पुरस्कार
- महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार
- महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार
- मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार